फोटो सौजन्य – X
आयपीएल 2025 मध्ये रिषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला, त्याने दिल्ली कॅपिट्ल्सला सोडले आणि त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने त्याला 27 कोटींना विकत घेतले. पाच वेळा चॅम्पियन विजेता संघ चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे संघ गुणतालिकेमध्ये शेवटच्या स्थानावर राहिला. आता आयपीएल 2026 ची चर्चा सुरु झाली आहे. आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसनवर पैशांचा पाऊस पडला आहे.
केरळ क्रिकेट लीगच्या दुसऱ्या हंगामात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या दिग्गज खेळाडूला कोची ब्लू टायगर्सने 26.60 लाख रुपयांना खरेदी केले आहे. विशेष म्हणजे सॅमसनची बेस प्राईस ३ लाख रुपये होती. कोचीने विक्रमी किंमत देऊन त्याला त्यांच्या संघात समाविष्ट केले. या फ्रँचायझीने ५० लाख रुपयांच्या निम्म्याहून अधिक रकमेचा खर्च सॅमसनवर केला. यावरून संजू केरळसाठी किती मोठा खेळाडू आहे हे कळते.
लिलावादरम्यान, त्रिशूर टायटन्स संघ एका क्षणी संजूचा पाठलाग करत होता. त्यांनी २० लाख रुपयांची बोली लावली होती, परंतु नंतर कोची ब्लू टायगर्सने बोली वाढवून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि सॅमसनला त्यांच्या संघात आणण्यात यश मिळवले. तिरुअनंतपुरममध्ये झालेल्या लिलावात सर्व संघांची एकूण रक्कम ५० लाख रुपये होती. याचा अर्थ असा की एक संघ जास्तीत जास्त ५० लाख रुपये खर्च करू शकतो. अशा परिस्थितीत कोचीने आपल्या अर्ध्याहून अधिक पैशांचा खर्च सॅमसनवर केला. हा निर्णय चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा आहे, परंतु संजूची प्रतिष्ठा पाहता, कोणताही संघ त्याच्यासाठी हे करण्यास तयार असता.
You are big when teams are ready to spend more than 50 percentage of their purse on you.
Sanju Samson , biggest talk of the town in recent times ❤️😎 pic.twitter.com/ZPRXeQTBOd
— naviyo (@naviyoisback) July 5, 2025
आता या हंगामात सॅमसन कोची ब्लू टायगर्ससाठी काय करतो हे पाहणे बाकी आहे. संजू सॅमसन व्यतिरिक्त, केरळचा संघातील सहकारी विष्णू विनोदवरही भरपूर पैशांचा वर्षाव झाला आहे. तो या हंगामातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला एरिस कोल्लमने १३.८ लाख रुपयांना खरेदी केले. जलज सक्सेनाला अॅलेप्पी रिपल्सने १२.४ लाख रुपयांना खरेदी केले.
संजू सॅमसन शेवटचा आयपीएल २०२५ मध्ये दिसला होता. दुखापतीमुळे तो १८ व्या हंगामात बहुतेक सामने खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत अष्टपैलू रियान परागने राजस्थान रॉयल्सची जबाबदारी सांभाळली. आयपीएल २०२५ च्या ९ सामन्यांमध्ये त्याने ३६ च्या सरासरीने आणि १४० च्या स्ट्राईक रेटने २८५ धावा केल्या. आता संजू पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसणार आहे.