फोटो सौजन्य – X (ICC)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्याचा अहवाल : ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये तीन सामन्याची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेचा दुसरा सामना सध्या सुरु आहे. या सामन्याचे दोन दिवस पार पडले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवल्यानंतर आता कागांरुचा संघ हा दुसऱ्या सामन्यात गडगडला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ग्रेनाडातील सेंट जॉर्जेस येथील नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ विकेट गमावल्यानंतर १२ धावा केल्या आहेत. कांगारू संघाकडे ४५ धावांची आघाडी आहे.
पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २८६ धावांवर संपला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाने झाली. ब्रँडन किंगच्या अर्धशतकामुळे वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या डावात २५३ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज काही खास करू शकला नाही. अर्धशतक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असताना जॉन कॅम्पबेल झेलबाद झाला. त्याने ५२ चेंडूत ४० धावा केल्या.
वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली आणि संघाला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. जोश हेझलवूडने क्रेग ब्रॅथवेटला झेलबाद केले. क्रेग ब्रॅथवेटने ८ चेंडू खेळले आणि त्याला खातेही उघडता आले नाही. केसी कार्टीने ६, कर्णधार रोस्टन चेसने १६, शाई होपने २१, जस्टिन ग्रीव्हजने १, अल्झारी जोसेफने २७ आणि अँडरसन फिलिपने १० धावा केल्या.
The end of an enthralling day’s play.
More of the same tomorrow 💪🏾 #WIvAUS | #FullAhEnergy pic.twitter.com/IHKEUKNrXk
— Windies Cricket (@windiescricket) July 4, 2025
जेडेन सील्स ७ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लायनने ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने प्रत्येकी २-२ बळी घेतले. मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर आणि ट्रॅव्हिस हेड यांना १-१ यश मिळाले. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला ३३ धावांची आघाडी मिळाली.
तथापि, दुसऱ्या डावात कांगारूंची सुरुवात खराब झाली. संघाने ४ धावांच्या आत २ विकेट गमावल्या. पहिल्याच षटकात जेडेन सील्सने सॅम कॉन्स्टासला बाद केले. पहिल्या डावात २५ धावा करणाऱ्या सॅम कॉन्स्टासला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. तिसऱ्या षटकात उस्मान ख्वाजा (२) सील्सने एलबीडब्ल्यू केला. खेळ थांबला तेव्हा कॅमेरॉन ग्रीन ६ आणि नाथन लायन २ धावांवर नाबाद आहेत.