
Sanju Samson out of World Cup! Jitesh Sharma's lottery for wicketkeeper; Exciting prediction from former player
Sanju Samson vs Jitesh Sharma : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या ५ सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. या वेळी पहिल्या सामन्यात भारतीय संघात संजू सॅमसनऐवजी जितेश शर्माचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून विचार करण्यात आला होता. हा पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी संघ व्यवस्थापनाकडून करण्यात येत असलेला एक प्रयोग मानण्यात येत आहे.अशातच आता भारताचा माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ताने या दोन खेळाडूंबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
संजू सॅमसनपेक्षा खालच्या ऑर्डरच्या स्पेशालिस्ट फिनिशरला प्राधान्य देण्यात आल्याने थिंक टँकला दोष देणे योग्य नाही. शुभमन गिलच्या पुनरागमनानंतर सॅमसनला फलंदाजी क्रमात अव्वल क्रमांकावरुण वगळण्यात आले. यांमदये त्याची काही एक चूक नव्हती. तेव्हापासून, तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. जितेश शर्मा हा संघात फिनिशरची भूमिका वठवू शकतो. दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खराब कामगिरी करत नसेल, तर टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो यष्टीरक्षक-फलंदाजाची भूमिका बाजवताना दिसू शकतो.
सॅमसन आणि जितेश या दोन खेळाडू व्यतिरिक्त इतर तिसऱ्या कोणालाही यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून विचारात घेणे शक्य दिसत नाही. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते जर सॅमसनला वरच्या फळीत फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली नाही, तर खालच्या फळीत फलंदाजी करणाऱ्या जितेशचा समावेश करणे योग्य ठरेल.
भारताचा माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ताने पीटीआयला संगीतेल की, “हा योग्य निर्णय असेल, जर संजू पहिल्या तीनमध्ये नसेल आणि यष्टीरक्षक मधल्या फळीत फलंदाजी करणार असेल, तर तुम्ही टॉप फळीतील फलंदाजापेक्षा एका विशेषज्ञ खालच्या फळीतील फलंदाजाला संघात समाविष्ट करणे योग्य ठरवाल. प्रत्येक खेळाडूसाठी दोन किंवा चार चेंडू फलंदाजी करणे हे काही सोपे नसते. जितेश पुढे म्हणतो की, “विश्वचषकापूर्वी भारताला नऊ सामने खेळायचे असून टी-२० विश्वचषकापूर्वी मला फारसा बदल अपेक्षित वाटत नाही.”
हेही वाचा : लग्न मोडल्यानंतर Smriti Mandhana पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर…; दिल्ली विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पंड्याच्या शानदार खेळीच्या(नाबाद ५९ धावा) जोरावर ६ गडी गमावून १७५ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ ७४ धावांवर गारद झाला. परिणामी भारताने सामना १०१ धावांनी जिंकला.