दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर सूर्याने सहकाऱ्यांना दिला संदेश(फोटो-सोशल मीडिया)
Suryakumar Yadav’s message to the Indian team : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणतो की खेळाडूनी न घाबरता खेळाचा आनंद घ्यावा.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “मी नाणेफेकीत म्हटले होते की सामना जिंकण्याची शक्यता पन्नास-पन्नास आहे, परंतु आम्हाला प्रथम फलंदाजी करताना खूप आनंद झाला. आम्ही ३ बाद ४८ धावा फटकावल्या आणि त्यानंतर आम्ही १७५ धावा उभ्या केल्या. हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि शेवटी जितेशने येऊन आपली भूमिका बजावली, मला वाटते की ते खूप महत्वाचे ठरले.”
सूर्या पुढे म्हणाला की, “जेव्हा तुमच्याकडे ७-८ फलंदाज असतात, तेव्हा फक्त दोन किंवा तीन फलंदाजांचा दिवस नसतो. तर इतर चार फलंदाज डावाचे नेतृत्व करत असतात. त्यांनी या सामन्यात अगदी तसेच केले आहे. कदाचित पुढच्या सामन्यात कोणीतरी दुसरे नेतृत्व करताना दिसेल. टी-२० क्रिकेट असेच चालते आणि आम्हाला प्रत्येकाने निर्भयपणे खेळावे आणि फलंदाजीचा आनंद घ्यायला हवे, असे वाटते.”
कर्णधार सूर्याने गोलंदाजांचे देखील कौतुक केले. तो म्हटला आहे की, “भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मला वाटते की अर्शदीप आणि बुमराह हे नवीन चेंडूने सुरुवात करण्यासाठी परिपूर्ण गोलंदाज राहिले आहेत. जेव्हा दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांकयकडून घेण्यात आला, तेव्हा अर्शदीप आणि बुमराह यांनी नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची पद्धत त्यांना सर्वोत्तम पर्याय बनला. हार्दिक दुखापतीतून परतला असताना त्याची काळजी घेणे देखील जास्त महत्त्वाचे होते.”
हेही वाचा : “ती माझ्या आयुष्यात आल्यापासून…”, हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच गर्लफ्रेंड माहिका शर्माबद्दल केले मोठे विधान
भारतीय संघाने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पंड्याच्या शानदार खेळीच्या(नाबाद ५९ धावा) जोरावर ६ गडी गमावून १७५ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ ७४ धावांवर गारद झाला. परिणामी भारताने सामना १०१ धावांनी जिंकला.






