
सार्थक रंजनने केला स्वतःच्या करिअरचा खुलासा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पण या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला हे फार कमी लोकांना माहिती आहे. खरं तर पप्पू यादवचा मुलगा म्हणून आता चर्चेत आला आहे. पण त्यामागे त्याची काय मेहनत आहे आणि त्याने काय भोगलं आहे याबाबत त्याने स्वतः एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.
सार्थक रंजन बनणे सोपे नाही!
सार्थकचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक त्याच्या खेळाचे कौतुक करत आहेत. पण फार कमी लोकांना माहिती आहे की सार्थकचे बालपण अडचणींनी भरलेले होते. जेव्हा जेव्हा त्याने काहीही साध्य केले तेव्हा लोक त्याच्या कामगिरीपेक्षा त्याच्या पालकांसाठी त्याचे कौतुक करायचे.
सार्थक रंजनचे पालक, रंजीत रंजन आणि राजेश रंजन, ज्याला पप्पू यादव म्हणूनही ओळखले जाते, ते दोघेही राजकारणात कार्यरत आहेत. एका प्रभावशाली राजकीय कुटुंबातून असल्याने, त्याची कीर्ती अनेकदा त्याच्या पालकांच्या कामामुळे झाकोळली होती. सोशल मीडियावर त्याचे खूप मोठे फॉलोअर्स आहेत. तो लक्झरी कार चालवतो आणि याशिवाय आपण किती मोठ्या घराण्यातून आहोत हेदेखील कधी त्याने लपवून ठेवले नाही. याशिवाय गाण्याची आवडही जगजाहीर आहे. मात्र यामध्ये नक्की स्ट्रगल कुठे आहे असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल?
TimesofIndia.com ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, सार्थक म्हणाला की, “जर मी आयुष्यात आलेल्या टोमण्यांबद्दल तक्रार केली तर मला स्वार्थी म्हटले जाईल. कारण मी नेहमीच गोष्टी अशाच प्रकारे पाहिल्या आहेत. मला सधन कुटुंब मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. मी माझ्या कुटुंबाबद्दल आणि जास्त प्रयत्न न करता मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल खूप आभारी आहे. माझ्याकडे घर आहे. माझ्याकडे खाण्यासाठी अन्न आहे. पण अशा सधन कुटुंबातून आल्यानंतरही अनेकदा मी केलेले काम हे कुठेतरी झाकोळले गेले होते”
IPL 2026 Mini Auction : IPL 2026 च्या लिलावात KKR ची मोठी खेळी! ‘या’ खेळाडूसाठी मोजले 18 कोटी रुपये
संघात निवड झाल्याबाबत आनंदी
केकेआर संघात निवड झाल्यामुळे सार्थक रंजन खूप आनंदी आहे. तो म्हणाला, “मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे.” मी सध्या नशिबाबद्दल विचार करत नाहीये. सर्व काही त्याच्या वेळेत आणि त्याच्या गतीने घडत आहे. म्हणून देवाने मला ही संधी दिली याबद्दल मी आनंदी आणि आभारी आहे.”
सार्थकच्या कामगिरीने केकेआरचे लक्ष वेधून घेतले. २९ वर्षीय सार्थक दिल्ली प्रीमियर लीगमध्ये नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सकडून खेळतो. पहिल्या हंगामात त्याची कामगिरी संमिश्र होती. त्याने १० डावांमध्ये २५२ धावा केल्या. तथापि, दुसऱ्या सत्रात त्याची कामगिरी आणखी प्रभावी होती. यावेळी, त्याने फक्त नऊ सामन्यांमध्ये ४४९ धावा केल्या. या काळात क्रिकेट चाहत्यांनी सार्थककडून एक शतक आणि चार अर्धशतके पाहिली आहेत.