कॅमेरॉन ग्रीन(फोटो-सोशल मीडिया)_
Cameron Green’s first reaction after being sold to Kolkata : कॅमेरॉन ग्रीन IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू बनला असून त्याला कोलकाता नाईट रायडर्सने २५.२० कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले आहे. ग्रीनला मोठी बोली लागेल याबाबत अनेकांनी अंदाज बांधलेला होता आता अपेक्षेप्रमाणे ते वास्तवात उतरले आहे. कॅमेरॉन ग्रीनने या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आनंद साजरा केला. त्याने त्याच्या नवीन चाहत्यांसाठी एक व्हिडिओ संदेश देखील शेअर केला आहे.
हेही वाचा : IPL 2026 Mini Auction : IPL 2026 च्या लिलावात KKR ची मोठी खेळी! ‘या’ खेळाडूसाठी मोजले 18 कोटी रुपये
कॅमेरॉन ग्रीनने केकेआर चाहत्यांना दिलेल्या व्हिडिओ संदेशामध्ये म्हटले आहे की, “केकेआर चाहते, मी कॅमेरॉन ग्रीन आहे. या वर्षी आयपीएलमध्ये कोलकात्याचा भाग होण्यासाठी आणि ईडन गार्डन्समध्ये येण्यास मी खूप जास्त उत्सुक आहे. तिथल्या वातावरणाची सवय होण्यास मी उत्सुक आहे आणि आशा आहे की हे वर्ष आमच्यासाठी एक उत्तम वर्ष असणार आहे. लवकरच भेटू. आमीर केकेआर (मी केकेआर आहे).” हा व्हिडिओ केकेआरच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून पोस्ट केला गेला आहे.
मागील दोन हंगामात कॅमेरॉन ग्रीनने आयपीएलमध्ये असाधारणपणे चांगली कामगिरी बजावली आहे. २०२३ मध्ये तो मुंबई इंडियन्सचा महत्वाचा भाग होता, तर २०२४ मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसला. आतापर्यंत त्याने २९ सामन्यांमध्ये २८ डावांमध्ये ४१.६ च्या सरासरीने आणि १५३.७ च्या स्ट्राईक रेटने एकूण ७०७ धावा फटकावल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके देखील झळकवले आहेत. ज्यामध्ये ६२ चौकार आणि ३२ षटकार खेचले आहेत. त्याने अद्याप आयपीएलमध्ये गोलंदाजी मात्र केलेली नाही.
First words from our 🆕 Knight 🎙️😍 pic.twitter.com/Qmg80QksXj — KolkataKnightRiders (@KKRiders) December 16, 2025
टी२० क्रिकेटमधील ग्रीनची कामगिरी देखील खूपच प्रभावी राहिली आहे. त्याने ६३ टी२० सामन्यांमध्ये ३३.३५ च्या सरासरीने आणि १५१.०७ च्या स्ट्राईक रेटने एकूण १३३४ धावा काढल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि आठ अर्धशतके झळकावली असून १११ चौकार आणि ६३ षटकार मारले आहेत. ग्रीनने चेंडूने देखील आपली छाप पाडली आहे. त्याने ३४.४२ च्या सरासरीने आणि ९.०५ च्या इकॉनॉमी रेटने २८ बळी टिपले आहेत.






