फोटो सौजन्य - JioHotstar
Singapore Badminton Open : सिंगापूर बॅडमिंटन ओपनचे सामने सध्या सुरू आहेत. यामध्ये भारताच्या पुरुष डबलच्या जोडीने यामध्ये कमालीची कामगिरी केली आहे त्यांनी आजच्या क्वाटर फायनलच्या सामन्यांमध्ये मलेशियाच्या वर्ल्ड नंबर 2 क्रमांकाच्या जोडीला पराभूत करून आता सेमीफायनलमध्ये उडी मारली आहे. राऊंड ऑफ 16 मध्ये भारताचे अनेक खेळाडू होते पण पीव्ही सिंधू, एचएस प्रणाॅय यासारखे अनेक खेळाडू हे राऊंड 16 मध्येच स्पर्धेबाहेर झाले. आता फक्त भारताचे एकच जोडी ही उद्या सेमी फायनलचा सामना खेळताना दिसणार आहे.
आज सिंगापूर बॅटमिंटन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाचा सामना झाला या सामन्यात सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांनी मलेशियाच्या जोडीला 2-0 असे पराभूत करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या राऊंडमध्ये भारतीय जोडीने 21-17 असा पराभव केला तर दुसरा राउंड मध्ये 21- 15 असा पराभव करून सेमी फायनलची फेरी गाठली आहे.
बुधवारी म्हणेजच २७ मे रोजी या जोडीचा सामना राऊंड ऑफ 32 मध्ये मलेशियन जोडी सोबतच झाला होता यावेळी त्यांनी २–० या जोडीला देखील पराभुत केले होते. तर राऊंड ऑफ 16 मध्ये भारतीय जोडीचा सामना हा इंडोनेशियाच्या जोडीशी झाला होता या सामन्यात भारताच्या संघाला कसरत करावी लागली होती. यामध्ये भारतीय जोडीला विजय हा २–१ असा विजय मिळाला होता.
KFF Singapore Badminton Open 2025
MD – QF
🇮🇳Satwiksairaj RANKIREDDY🏅
21 21 🇮🇳Chirag SHETTY🏅
🇲🇾GOH Sze Fei
17 15 🇲🇾Nur IZZUDDIN🕚 in 39 minutes
— BWFScore (@BWFScore) May 30, 2025
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या रँकिंग बद्दल सांगायचे झाले तर २०२४ मध्ये या जोडीने पहिल्या स्थानावर बराच वेळ कब्जा केला होता पण ऑलिम्पिक त्याचबरोबर त्यानंतर अनेक इवेंट्स मध्ये खराब कामगिरीमुळे त्यांची रँकिंग खाली घसरली होती. सात्विकच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे तो बराच काळ स्पर्धांमध्ये खेळला नाही. या स्पर्धेमध्ये जर त्यांनी विजय मिळवला तर संघ नक्कीच रँकिंगमध्ये चांगली कामगिरी करेल. सध्या ही भारतीय जोडी २७ व्या क्रमांकावर आहे.
सिंगापूर बॅडमिंटन ओपन या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये देखील सात्विक आणि चिराग या जोडीचा सामना आणखी एका मलेशियाच्या जोडीशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सेमीफायनलचे सामने हे उद्या म्हणजेच 31 मे रोजी खेळवले जाणार आहेत.