पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वैभव सूर्यवंशी भेट(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची खूप चर्चा झाली आहे. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. तो आता इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्याआधी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट पाटणा विमानतळावर झाली आहे. पंतप्रधानांनी स्वतः त्यांच्या एक्स हँडलवरून याबद्दल माहिती दिली आहे. वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त मोदींनी त्यांच्या पालकांना देखील भेटले. इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या १९ वर्षांखालील संघात वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून वैभव सूर्यवंशी यांच्याशी झालेल्या भेटीची पोस्ट शेअर केली आहे. मोदी यांनी या पोस्टमध्ये पाटणा विमानतळावर त्यांची भेट झाल्याचे सांगितले आहे. भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी वैभव सूर्यवंशीच्या क्रिकेट कौशल्याचे देखील भरभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले की संपूर्ण देशासाठी तू प्रेरणास्थान आहे. पंतप्रधान मोदींकडून वैभव सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबासोबत झालेल्या भेटीचे फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत.
हेही वाचा : RCB Vs PBKS : ‘ही तर आत्महत्या…’, Sunil Gavaskar यांनी श्रेयस अय्यरला चांगलच सुनावलं, वाचा सविस्तर…
वैभव सूर्यवंशी आता इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. तो भारताच्या १९ वर्षांखालील संघासोबत इंग्लंडला दौऱ्यावर जाणार आहेत. १९ वर्षांखालील संघाचा इंग्लंड दौरा २४ जूनपासून सुरू होणार आहे. पंतप्रधानांनी वैभव सूर्यवंशीचे या इंग्लंड दौऱ्यासह इतर स्पर्धा आणि मालिकांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. वैभव सूर्यवंशी यांच्यासोबत माझ्या शुभेच्छा आहेत. असे मोदी म्हणाले आहेत.
वैभव सूर्यवंशी सध्या बंगळुरूमध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कॅम्प ठिकाणी उपस्थित होता. पंतप्रधान मोदी यांची खास भेट घेण्यासाठी पटना येथे आला होता.
At Patna airport, met the young cricketing sensation Vaibhav Suryavanshi and his family. His cricketing skills are being admired all over the nation! My best wishes to him for his future endeavours. pic.twitter.com/pvUrbzdyU6
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2025
राजस्थान रॉयल्सच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना दखल घ्यायला भाग पाडले. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त ३५ चेंडूत शतक झळकावले आणि सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले. सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय खेळाडू बनला आहे. सतेच तो टी२० मध्ये शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज देखील ठरला आहे. भारताच्या १९ वर्षांखालील संघाला आता इंग्लंड दौऱ्यावर देखील वैभव सूर्यवंशीकडून अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे. खेळाची आवश्यकता असेल.