जगातील अव्वल दर्जाची टेनिसपटू सेरेना विल्यम्सला टाेरंटाे मास्टर्स टेनिस स्पर्धेत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच आपल्या निवृत्तीची घोषणा करणाऱ्या सेरेना विल्यम्सने टाेरंटाे मास्टर्स टेनिस स्पर्धेतून लवकर एक्झिट घेतली आहे.
टाेरंटाे मास्टर्स टेनिस स्पर्धे सेरेना हिला स्वित्झर्लंडच्या बेलिंडाने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये २३ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेनाचा पराभव केला. स्वित्झर्लंडच्या खेळाडूने तिच्यावर ६-२, ६-४ ने मत करत सामना जिंकला. स्विसच्या बेलिंडाला आता तिसऱ्या फेरीमध्ये आठव्या मानांकित मुगुरुझाच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. स्पेनच्या या टेनिसपटूने दुसऱ्या फेरीत कानेपीला पराभूत केले आहे.
४० वर्षीय सेरेना विल्यम्स हिने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ती लवकरच निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती. सेरेना ही तब्बल २३ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरली असून कुटुंबाला वेळ देण्यासाठी आता टेनिस खेळातून निवृत्ती घेत असल्याचे तिने सांगितले होते.