फोटो सौजन्य : Punjab Kings
भारतीय संघाचा कर्णधार : इंडियन प्रीमियर लीग 2025 हा सीजन संपला आणि या सिझनचा विजेता आरसीबी या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली. पंजाब किंग्स विरुद्ध आरसीबी यांच्यामध्ये फायनलचा सामना झाला या सामन्यात आरसीबीच्या संघाने बाजी मारली. पंजाब किंग्स संघाने 11 वर्षानंतर फायनलमध्ये स्थान पक्के केले होते पण त्यांच्या हातातून ट्रॉफी निसटली. पण सध्या श्रेयस अय्यरच्या कॅप्टनसीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
श्रेयस अय्यरने मागील सीजनमध्ये आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला ट्रॉफी मिळवून दिली तर या सीजनमध्ये त्याने पंजाब किंग्सला फायनल पर्यंत नेले. श्रेयस अय्यरने सलग दोन सीझनमध्ये फायनलचे सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत. आयपीएल 2025 मध्ये त्याने फक्त कॅप्टनसीच नाही तर एक फलंदाज मिळून देखील चांगली कामगिरी केले आहे त्यांनी सतरा सामन्यांमध्ये 604 धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीने त्याने क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले होते. वृत्तांच्या माहितीनुसार आता एक मोठा क्लास झाला आहे.
वाइट बाॅल क्रिकेटसाठी बीसीसीआयच्या नजरेत कर्णधारपदासाठी नवा उमेदवार, या खेळाडूने केलं प्रभावित
मी त्यांच्या माहितीनुसार असा म्हटले जात आहे की आयपीएलमध्ये सातत्याने चांगल्या कामगिरीमुळे आत्ता टीम इंडियाला कर्णधार पदासाठी नवा उमेदवार मिळाला आहे. आयपीएल आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरसाठी चांगले दिवस येत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या दिलेल्या बातमीनुसार, अय्यरने कर्णधार म्हणून सर्वांना प्रभावित केले आहे. तो भारतीय संघाचा पुढचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत सामील झाला आहे.
ONE OF INDIAN CRICKET’S INFLUENTIAL DECISION MAKERS:
– “Right now Shreyas Iyer just plays ODIs but after this IPL, we can’t keep him out of T20I & even Tests. Plus, He also now officially Joined the white ball Captaincy race”. [Indian Express] pic.twitter.com/FjnVXDqmig
— Johns. (@CricCrazyJohns) June 8, 2025
इंडियन एक्सप्रेससोबत अधिकाऱ्याने संवाद साधताना सांगितले की, “सध्या श्रेयस अय्यर फक्त एकदिवसीय सामने खेळत आहे, परंतु आयपीएलनंतर आम्ही त्याला टी-२० आंतरराष्ट्रीय आणि अगदी कसोटी संघापासून दूर ठेवू शकणार नाही. यासह, अय्यर देखील पांढऱ्या चेंडूचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत सामील झाला आहे.” सूर्यकुमार यादव सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व करतो. त्याच वेळी, एकदिवसीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या हातात आहे.