फोटो सौजन्य : X
श्रेयस अय्यर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीच्या संघाने विजय मिळवला आणि श्रेयस अय्यरच्या संघाला म्हणजेच पंजाबला फायनलचे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. श्रेयस अय्यरने मागील सीजनमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून दिले होते. पंजाब किंगच्या संघाला श्रेयस अय्यरने 14 वर्षानंतर फायनलमध्ये नेले. 3 जून रोजी फायनल सामना पार पडला याच दरम्यान आता श्रेयस अय्यर आणखी एकदा फायनलचा सामना कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या मुंबई t20 लीग सुरू आहे. काल या स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी२० लीगमध्ये अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता अंतिम सामना १२ जून रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या लिगमध्ये भारतीय संघामधील अनेक खेळाडू हे या लीगमध्ये सामील झाले होते.
India vs Hong Kong : भारतीय फुटबाॅल संघाचा लाजिरवाणा पराभव! अजून किती चूका करणार? चाहते संतापले
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर मुंबई टी-२० लीगमध्ये मुंबई फाल्कन्स संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अय्यरने संघाला अंतिम फेरीत पोहोचवले आहे, पण यावेळी अय्यरला ट्रॉफी जिंकायची आहे. १२ जून रोजी अंतिम फेरीत मुंबई फाल्कन्सचा सामना मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सशी होईल. श्रेयस अय्यरच्या संघाने सेमीफायनलमध्ये नमो वांद्रे ब्लास्टर्सचा ५ विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. दुसरीकडे, मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने सेमीफायनलमध्ये ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा पराभव केला.
SHREYAS IYER LED SOBO MUMBAI FALCONS QUALIFIED INTO THE FINAL OF T20 MUMBAI LEAGUE 2025. 🏆 pic.twitter.com/7lWNiFH7O4
— Johns. (@CricCrazyJohns) June 10, 2025
दुसऱ्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वांद्रे ब्लास्टर्सने २० षटकांत १३० धावा केल्या. वांद्रेकडून फलंदाजी करताना ध्रुमिलने ३० चेंडूत सर्वाधिक ३४ धावा केल्या. कर्णधार आनंदने ३१ धावा केल्या. मुंबई फाल्कन्सकडून गोलंदाजी करताना आकाश पारकरने २ षटकांत १६ धावा देत २ बळी घेतले. आकाश व्यतिरिक्त सिद्धार्थ रावतनेही २ बळी घेतले.