फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Shreyas Iyer named ICC Player of the Month : भारतामध्ये प्रीमियर लीगचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आयपीएलची चर्चा सुरु आहे. आज आयपीएल २०२५ चा ३१ वा सामना सुरु होणार आहे. यामध्ये पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्सचा संघ यंदा श्रेयस अय्यरच्या नेत्तृत्वात मैदानात उतरणार आहे तर संघाने आतापर्यत ३ सामने जिंकले आहेत आणि २ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
आयसीसीने भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला मार्च महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडून मोठा सन्मान दिला आहे. त्याने न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि जेकब डफी यांना हरवून हा मान मिळवला. गेल्या महिन्यात पाकिस्तान आणि दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्या प्रभावी कामगिरीचे बक्षीस अय्यरला मिळाले आहे. अय्यरने स्पर्धेत २४३ धावा केल्या आणि तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या कामगिरीच्या आधारे, अय्यरने विशेष यादीत स्थान मिळवले आहे.
🚨 BREAKING 🚨
Shreyas Iyer has been named the ICC Player of the Month (March) for his stellar performances in the Champions Trophy 2025! 🇮🇳🏏
Well deserved! 👏🔥#Cricket #ShreyasIyer #India #ICC pic.twitter.com/5LXTyAZH1R
— Sportskeeda (@Sportskeeda) April 15, 2025
यासह, श्रेयस एकापेक्षा जास्त वेळा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांनीही हा पुरस्कार एकापेक्षा जास्त वेळा जिंकला आहे. बुमराहने हा पुरस्कार दोनदा जिंकला आहे, तर गिलने जास्तीत जास्त तीन वेळा हा सन्मान जिंकला आहे.
‘महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू’ झाल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, ‘मार्च महिन्यासाठी ‘महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून निवड झाल्याबद्दल मी सन्मानित आहे.’ हा सन्मान खरोखरच खूप खास आहे. मी नेहमीच हा क्षण जपून ठेवेन. मोठ्या मंचावर भारताच्या यशात योगदान देणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. माझ्या सहकाऱ्यांच्या, प्रशिक्षकांच्या आणि सपोर्ट स्टाफच्या अढळ पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी आभारी आहे.
Indian Men’s cricketers to win ICC player of the month award:
1) Shubman Gill (3 Times)
2) Jasprit Bumrah (2 Times)
3) Shreyas Iyer (2 Times)
4) Rishabh Pant
5) Ravichandran Ashwin
6) Bhuvneshwar Kumar
7) Virat Kohli
8) Yashasvi Jaiswal pic.twitter.com/fYVy4DZ9NU— Johns. (@CricCrazyJohns) April 15, 2025
१) शुभमन गिल (३ वेळा)
२) जसप्रीत बुमराह (२ वेळा)
३) श्रेयस अय्यर (२ वेळा)
४) ऋषभ पंत
५) रविचंद्रन अश्विन
६) भुवनेश्वर कुमार
७) विराट कोहली
8) यशस्वी जैस्वाल