श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे(फोटो-सोशल मिडिया)
PBKS vs KKR : आयपीएल २०२५ चा टप्पा आता अर्ध्यावर पोहोचणार आहे. आज १८ व्या हंगामातील ३१ वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. पंजाब किंग्ज गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. तर केकेआर संघ पाचव्या स्थानावर विराजमान असून दोन्ही संघ आपले स्थान सुधारण्याच्या अनुषंगाने मैदानात उतरणार आहेत. हा सामना महाराजा यादविंद्र सिंह स्टेडियम, मुल्लानपूर, न्यू चंदीगड येथे रात्री ७.३० वाजता सुरू होणार आहे.
मुल्लानपूर स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक मानली जाते. येथे आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जचे प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या आत्मविश्वासला नक्कीच तडा गेलेला असावा. कारण गेल्या सामन्यात दोघांनी मिळून ७ षटकांत ९६ धावा मोजल्या होत्या. जर पंजाबने या सामन्यासाठी सपाट खेळपट्टी तयार केली असल्यास, त्यांचे गोलंदाज २२० धावांपर्यंतच्या धावसंख्येचा बचाव करू शकतील असे वाटत नाही, कारण कोलकाताच्या संघात सुनील नारायण, रिंकू सिंग आणि वेंकटेश अय्यरसारखे आक्रमक फलंदाजांचा भरणा आहे.
त्याच वेळी, कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणे देखील स्फोटक फलंदाजी करताना दिसत आहे. याउलट, जर पंजाबने संथ खेळपट्टी तयार केली, तर उलट परिस्थिति बघायाला मिळू शकते. कारण, नाईट रायडर्सच्या ताफ्यात सुनील नरेनसारखा अव्वल गोलंदाज आणि वरुण चक्रवर्तीसारखा मिस्ट्री फिरकी गोलंदाज आहे.
हेही वाचा : LSG vs CSK : ‘एक संघ म्हणून, मी प्रत्येक…’ सीएसकेविरुद्धच्या पराभवानंतर ऋषभ पंतचे खळबळ माजवणारे विधान
कोलकाता आणि पंजाब यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल सांगायचे झाले तर, केकेआर वरचढ असल्याचे दिसते. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ ३३ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये कोलकाताने २१ वेळा पंजाबचा धुव्वा उडवला आहे. तर, पंजाबने केवळ १२ वेळा विजय मिळवला आहे.
हेही वाचा : PSL 2025 : पाकिस्तानी गोलंदाजाची कृती संशयास्पद..! PSL 2025 वर लागला डाग, खेळाडूवर बंदीची शक्यता
अॅक्यूवेदरच्या मते, आज पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. सामन्यादरम्यान कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहण्याची आशा असून संध्याकाळी ते २६ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
पंजाब किंग्जचा संभाव्य प्लेइंग ११ : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, नेहल वधेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॉन्सन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला गेल्या सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये खेळणे त्याच्यासाठी कठीण मानले जात आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य खेळी ११ : कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य खेळत 11: रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष्ण रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मोईन चक्कन अली, जॉन चॅनेरा/सिंगल, चकरा/स्वामी