IPL 2025: New 'Jai-Veer' pair unveiled! Shubhman Gill-Sai Sudarsan on track to become the most successful opener in the tournament..
IPL २०२५ : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम आता अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ६१ सामने खेळवण्यात आले आहेत. भारत पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे बीसीसीआय ने आयपीएल एक आठवडा पुढे ढकलले होते. १७ मे पासून ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आयपीएल २०२५ मध्ये शुभमन गिल आणि साई सुदर्शन या गुजरात टायटन्सच्या सलामीवीरांनी धावांचा पाऊस पाडला आहे. यांनी आयपीएल २०२५ मध्ये आपल्या शानदार फलंदाजीने विरोधी संघांना धुळीत मिळवून टाकले आहे. गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यात या जोडीने मोठे योगदान दिले आहे. भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तिथे होणाऱ्या कसोटी मालिकेत ही जोडी संघाची सलामी जोडी म्हणून खेळणार असल्याची चर्चा सद्या होत आहे.
सध्या आयपीएलमधील नवीन जय-वीरू जोडी सर्वात यशस्वी जोडी बनण्याच्या मार्गावर आहे. या जोडीने फक्त १२ डावांमध्ये या जोडीने ८३९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १०० पेक्षा जास्त धावांच्या तीन भागीदारींचा समावेश देखील आहे. परिस्थिती अशी आहे की त्यांच्याकडे अजूनही कमीत कमी तीन सामने शिल्लक आहेत ज्यात भरपूर धावा करून ते लीगच्या इतिहासात एका हंगामात १००० धावांचा आकडा गाठणारी पहिली जोडी बनू शकतील.
गिल आणि साई ही जोडी आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय जोडी बनली आहे. ती अजून देखील सर्वकालीन विक्रमापेक्षा ९० धावांनी पिछाडीवर आहे. हा अनोखा विक्रम आयपीएलमधील सर्वात दिग्गज जोडी म्हणजेच विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या नावावर जमा आहे. ज्यांनी २०१६ च्या आवृत्तीत १३ डावात ९३९ धावा केल्या होत्या. यादीतील दुसरी जोडी देखील आरसीबीची आहे आणि त्यातही विराट कोहलीचा समावेश आहे. २०२३च्या आवृत्तीत त्याने आणि फाफ डु प्लेसिसने १४ डावात ९३९ धावांचा पाऊस पाडला होता. यादीतील तिसरी जोडी म्हणजे सीएसकेची २०२३ ची सलामी जोडी ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे, ज्यांनी १५ डावांमध्ये ८४९ धावा केल्या आहेत.
केएल राहुलकडून विराटचा विक्रम खालसा..
रविवारी केएल राहुलने त्याच्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा पार केला आहे. तो ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८,००० धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू ठरला. राहुलने हा टप्पा ओलांडण्यासाठी फक्त २२४ डाव घेतले.