अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Abhishek Sharma IPL Records : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात ६१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात हैद्राबादने एलएसजीला पराभूत केले. प्रथम फलंदाजी करत एलएसजीने २०५ धावा केल्या. प्रतिउत्तरात एसआरएच संघाने १९ व्या षटकातच टार्गेट पूर्ण करून एलएसजीचा पराभव केला. या सामन्यात हैद्राबादच्या अभिषेक शर्माने तुफानी खेळी करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याने २० चेंडूत ५९ धावांची शानदार खेळी केली. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ६ षटकार लगावले.
अभिषेकच्या या शानदार खेळीच्या जोरावरच हैदराबादला ६ विकेट्सनी सामना आपल्या नावावर केला. आपल्या धमाकेदार खेळीदरम्यान अभिषेकने अनेक विक्रम देखील रचले आहे. आयपीएलच्या इतिहासात २० चेंडूंपेक्षा कमी वेळात चार अर्धशतके झळकावण्याचा विक्रम अभिषेक शर्माने नोंदवाला आहे. असे करणारा अभिषेक एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे.
अभिषेकनच्या नावे अजून एका विक्रमाची नोंद जमा झाली आहे. आयपीएलमध्ये कोणत्याही भारतीयाने असा पराक्रम आजवर केलेला नाही. अभिषेक शर्माने २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध १६ चेंडूत, २०२५ मध्ये लखनौविरुद्ध १८ चेंडूत आणि १९ चेंडूत (२०२४ मध्ये) अर्धशतके पूर्ण केली आहेत. तसेच २०२५ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. याशिवाय, अभिषेक शर्मा २०२४ पासून आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. २०२४ पासून आतापर्यंत अभिषेकने आयपीएलमध्ये २७ डाव खेळले असून त्यामध्ये त्याने एकूण ६५ षटकार लगावले आहेत.
हेही वाचा : बांगलादेशला नमवत भारताने SAFF U-19 Championship च्या विजेतेपदावर कोरले नाव..; पहा व्हिडिओ
हेही वाचा : IPL 2025 : ‘श्रेयस अय्यरचे श्रेय हिरावून घेतले..’, लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचा प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा..






