वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
जयपूर : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगाम हा अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामादरम्यान अनेक घटना घडल्याचे सर्वांनी पाहिले आहे. अशाच एक प्रकार राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर वैभव सूर्यवंशीबाबतही घडला होता. पदार्पणापासूनच तो आपल्या कामगिरीने चांगलाच चर्चेत राहिला आहे. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात, त्याने आवेश खान आणि शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर षटकार मारून मोठ्या मंचावर सर्वाना आपली दखल घ्यायला भाग पाडले होते. तो त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात २० चेंडूत ३४ धावा काढून बाद झाला. पदार्पणाच्या सामन्यात वैभव बाद होताच तो मंडपाकडे चालत जात असताना तो रडत असल्याचे दिसून आले होते. पण तो रडत नसल्याचे वैभवने स्वतः खुलासा केला आहे.
वैभव सूर्यवंशीने याबाबत खुलासा केला की, इंडियन प्रीमियर लीगमधील त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात बाद झाल्यानंतर तो रडत नव्हता. परंतु, स्क्रीनच्या लख्ख प्रकाशामुळे त्याचे डोळे दुखत होते आणि जळत होते. त्याने त्याच्या डोळ्यांना हात लावला तर सर्वांना वाटले की तो रडत आह आणि सगळीकडे तीच चर्चा सुरू झाली.
Vaibhav roya ki nahi?
📹 jaaniye uski zubaani 😋 pic.twitter.com/3GwD3r31DJ— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 19, 2025
सूर्यवंशी डगआउटकडे जात असताना डोळे चोळताना दिसून आला. सर्वांना असे वाटले की १४ वर्षांचा हा खेळाडू त्याच्या बाद होण्याने दुःखी झाला असून तो रडत आहे. जेव्हा पंजाब किंग्जच्या मुशीर खानकडून वैभवला विचारण्यात आले की, आउट झाल्यानंतर का रडत आहे, तेव्हा संपूर्ण गोष्ट उघड झाली. या संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे.
वैभव म्हणाला, “मी कधी रडलो मित्रा? काही नाही, मी तुला सांगेन. माझा डोळा खूप दुखत होता आणि बाहेर पडून परत जात असताना मी स्क्रीनकडे पाहिले. माझ्या डोळ्यावर प्रकाश पडला, तेव्हा ते असेच घडले. आत्ताच मी बाहेर गेलो तेव्हा लोक मला विचारत होते की मी का रडत आहे? मी रडलो नाही. अचानक माझ्या डोळ्यात प्रकाश आला होता.
हेही वाचा : बांगलादेशला नमवत भारताने SAFF U-19 Championship च्या विजेतेपदावर कोरले नाव..; पहा व्हिडिओ
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने राजस्थानसाठी सहा सामन्यांमध्ये ३२.५ च्या सरासरीने आणि २१९.१ च्या प्रभावी स्ट्राईक रेटने १९५ धावा काढल्या आहेत. संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी, सूर्यवंशीने फ्रँचायझीसाठी शानदार कामगिरी केली आहे.