
Shubman Gill Captaincy Record: शुभमन गिलचा कर्णधार म्हणून कसा आहे रेकॉर्ड? (Photo Credit- X)
शुभमन गिलने आतापर्यंत एकूण नऊ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. या काळात टीम इंडियाने पाच सामने जिंकले असून तीन गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. टीम इंडियाने आपला शेवटचा कसोटी सामना यावर्षी जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि ३०० धावांनी विजय मिळवला होता. गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान गिलने टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारले होते.
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!
कर्णधार म्हणून शुभमन गिलची फलंदाजीची कामगिरी अपवादात्मक राहिली आहे. त्याने आतापर्यंत नऊ कसोटी सामने खेळले असून, १५ डावांमध्ये ८२.७६ च्या सरासरीने १०७६ धावा केल्या आहेत. त्याने सहा शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. एकूण, त्याने ४१ कसोटी सामने खेळून ४४.३१ च्या सरासरीने २९६९ धावा केल्या आहेत. गिलने ११ शतके आणि आठ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या २६९ आहे.
श्रीलंका मालिकेसंदर्भात, सराव सामन्यापूर्वी शुभमन गिलच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर अनुपस्थित होता आणि पहिल्या डावात फलंदाजीला आला नाही. गिल भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला आणि ५४ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले. या सराव सामन्यात टीम इंडियाने श्रीलंका इलेव्हनचा सहा गडी राखून पराभव केला.