
IND vs SA Test series: Shubman Gill gets a chance to break the world record! Will he surpass Ricky Ponting?
हेही वाचा : IND vs SA: ‘आम्ही भारताला हरवण्यास उत्सुक…’, केशव महाराजने भारताविरुद्ध फोडली डरकाळी; दिले खुले आव्हान
शुभमन गिलने २०२५ मध्ये आधीच पाच शतके झळकवलेली आहेत. जर शुभमन गिलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चार डावांमध्ये तीन शतके लागावली तर तो पॉन्टिंगचा विश्वविक्रम मोडीत काढण्यास यशस्वी ठरले. शिवाय, शुभमन गिल एका वर्षात कर्णधाराने सर्वाधिक शतके ठोकण्याचा भारतीय विक्रम प्रस्थापित करण्यापासून केवळ एक शतकच दूर आहे.
भारताकडून कर्णधार म्हणून एकाच वर्षात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे. विराट कोहलीने २०१७ आणि २०१८ मध्ये दोनदा ही किमया साधली आहे. डॉन ब्रॅडमन (१९४८), अॅलन बॉर्डर (१९८५), ब्रायन लारा (२००७), महेला जयवर्धने (२००७) आणि मायकेल क्लार्क (२०१२) यांनी देखील कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून एकाच वर्षात पाच शतके ठोकली आहेत.
हेही वाचा : IND vs SA : या’ खेळाडूने घातलाय धावांचा रतीब! भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत गाठला ५०० धावांचा टप्पा
जर शुभमन गिलने दोन शतके ठोकली तर तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर येणार आणि जर त्याने आठ शतकांचा आकडा गाठला तर तो थेट दुसऱ्या क्रमांकावर येणार आहे. जर शुभमन गिलने मालिकेतील चारही डावात चार शतके केली तर तो एका कॅलेंडर वर्षात फलंदाजाने सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमाशी बरोबरी साधेल जो वर्तमानात मोहम्मद युसूफ (९) यांच्या नावावर जमा आहे. गुंडप्पा विश्वनाथ, सुनील गावस्कर, तेंडुलकर, राहुल द्रविड (दोनदा), वीरेंद्र सेहवाग आणि कोहली (दोनदा) यांनी एका वर्षात पाच शतके ठोकण्याची किमया केली आहे.