भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज. फोटो सौजन्य - X
भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने 319 धावांची खेळ खेळली होती. दक्षिण आफ्रिके विरुद्ध ही ऐतिहासिक धावसंख्या उभारली होती. वीरेंद्र सहवाग यांनी फक्त एकदाच नाहीतर दोन वेळा त्याने 300 चा आकडा पार केला होता. दुसऱ्यांदा त्याने पाकिस्तान विरुद्ध ३०९ धावा केल्या होत्या. फोटो सौजन्य - x
भारत विरुद्ध इंग्लंड दौऱ्यावर आठ वर्षानंतर कमबॅक करणारा करून नायर याने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये सर्वाधिक धावसंख्या 303 केली होती. करून नायरने इंग्लंड विरुद्ध ही धावसंख्या उभारली होती. फोटो सौजन्य - x
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या 2009 मधील मालिकेमध्ये टीम इंडिया साठी वीरेंद्र सेहवाग याने 293 धावांची खेळी खेळली होती. ही त्याची सर्वोत्तम तिसरी मोठी धावसंख्या आहे. फोटो सौजन्य - x
भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 281 धावांची खेळी केली होती. ही खेळी त्याने 2001 मध्ये घरच्या मैदानावर नावावर केली होती. फोटो सौजन्य - x
वाॅल ऑफ द क्रिकेट टीम राहुल द्रविड हा त्याच्या खास खेळीमुळे ओळखला जातो. राहुल द्रविड ने पाकिस्तान विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर 270 धावांची खेळ खेळली होती. धावसंख्या त्याने 2004 मध्ये केली होती. फोटो सौजन्य - x
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिल याने सामन्याच्या दुसऱ्या दिने 279 धावांची खेळी खेळली. मी त्याच्या करिअर मधील सर्वत्तम धावसंख्या आहे. त्याने दोन्ही सामन्यांमध्ये शतक झळकावले आहे. फोटो सौजन्य - BCCI