फोटो सौजन्य – X (Sri Lanka Cricket)
Sri Lanka vs Bangladesh 1st ODI match report : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला कालपासून सुरुवात झाली आहे. बांग्लादेशचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. पहिल्या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने घरच्या मैदानावर बांग्लादेशला पराभुत करुन पहिला विजय नोंदवला आहे. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने मालिकेचा पहिला विजय मिळवुन मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर वाचा.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश या सामन्यात श्रीलंकेचा संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेच्या संघाने पहिले फलंदाजी करत ४९.२ ओव्हरमध्ये २४४ धावा केल्या होत्या. यामध्ये श्रीलंकेच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर संघाने पहिले दोन विकेट्स लवकर गमावले होते. निस्सांका हा एकही धाव न करता पॅव्हेलियन मध्ये परतला. मधुशुंका देखील स्वस्तात बाद झाला त्याने फक्त संघासाठी ६ धावा केल्या आणि विकेट्स गमावली.
IND vs ENG : 310 धावा, 5 विकेट्स… 1 शतक! पहिल्या दिनी भारतीय फलंदाजांचा बोलबाला; वाचा सविस्तर
बांगलादेशच्या संघाने सुरुवात चांगली केली होती. कुशल मेंडीस याने संघाला सावरलं आणि संघासाठी ४५ धावा केल्या. कमींडू मेंडीस देखील फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. चारिथ असलंका याने संघाला संकटातून बाहेर काढलं आणि शतक झळकावले. त्याने १२४ चेंडूमध्ये १०६ धावा केल्या, यामध्ये त्याने ४ षटकार आणि ६ चौकार मारले. लियांगे याने संघासाठी ३१ चेंडूमध्ये २९ धावा केल्या तर रथनायके याने संघासाठी महत्त्वाच्या २२ धावा केल्या. हसरंगा याने संघासाठी २२ धावांची खेळी खेळली.
First Blood to Sri Lanka! 💪
Brilliant display by our Lions! Sri Lanka beat Bangladesh by 77 runs and take 1-0 lead in the ODI series! On to the next one!#SLvBAN #SriLanka pic.twitter.com/cwO4LSnHpl
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 2, 2025
श्रीलंकेच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर वानिंदू हसरंगा याने संघाला 4 विकेट्स मिळवुन दिले. त्याने तझीद हसन, लिटन दास, मेंहदी हसन मिराज, जाकेर अली यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याने लिटन दास याला शुन्यावर बाद केलं. कमिंडू मेंडीस याने देखील कौतुकास्पद कामगिरी केली. त्याने संघासाठी 3 विकेट्सची कमाई केली. महेश तिक्षणा आणि असिथा फर्नांडो या दोघांनी संघाला प्रत्येकी 1 विकेट मिळवुन दिला.