फोटो सौजन्य – X (BCCI)
Day 1 of the second match between India and England : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये भारतीय संघाची सुरुवात खराब झाली कारण भारताचा सलामीवीर फलंदाज के एल राहुल याने त्याचा लवकर विकेट गमावला आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा केएल राहुल दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये स्वस्तात बाद झाला. यशस्वी जयस्वाल याने त्याचा जलवा आणखी एकदा दाखवला.
पहिल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर त्याने या सामन्यात देखील भारतीय संघाला सावरलं. यशस्वी जयस्वालने संघासाठी ८७ धावांची खेळी खेळली आणि भारताच्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये उभे केले. करुण नायर याने भारतीय संघाला काही काळासाठी साथ दिली आणि त्यानंतर तो बाद झाला. करुण नायर याने संघासाठी ३१ धावांची खेळ खेळली आणि यशस्वी जयस्वाल सोबत त्याने 80 धावांची भागीदारी केली. मागील सामन्यात दोन्हीही डावांमध्ये शतक झळकावणारा ऋषभ पंत या सामन्यात स्वस्तात बाद झाला.
दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये त्याने फक्त 25 धावा केल्या. शार्दुल ठाकूर च्या जागेवर दुसऱ्या सामन्यांमध्ये नितीश कुमार रेड्डीला संघामध्ये स्थान मिळाले आहे. पण तो या दुसऱ्या सामन्यात फेल ठरला. पहिल्या सामनाच्या पराभवानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिल याच्या बॅटमधून शतक येणे ही फारच कौतुकास्पद कामगिरी आहे.
Stumps on the opening day of the 2nd Test 🏟️#TeamIndia finish Day 1 with 310/5 on board 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/hzMC3Befky
— BCCI (@BCCI) July 2, 2025
पहिले सामन्यांमध्ये भारताच्या संघाने चांगली फलंदाजी केली होती या सामन्यात जसप्रीत बुमराह, त्याचबरोबर शार्दुल ठाकूर हे दोन्ही फलंदाज संघाचा भाग नाही याची जागेवर आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संधी देण्यात आले आहे. पहिल्या दिनाच्या समाप्तीनंतर भारताच्या संघाने 5 विकेट्स गमावुन 310 धावा केल्या आहेत. भारताचा संघ दुसऱ्या दिनाची सुरुवात ही शुभमन गिल आणि रविंद्र जडेजा हे दोघे त्याच्या फलंदाजीने करेल.
शुभमन गिलच्या कामगिरी बद्दल सांगायचे झाले तर त्याने आज शतक झळकावले पहिल्या दिनाच्या समाप्तीनंतर त्याने 113 धावांची खेळी खेळली आहे आणि नाबाद आहे त्याची साथ सध्या रवींद्र जडेजा देत आहे. रवींद्र जडेजा ने पहिला दिनाच्या समाप्तीनंतर 41 धावा केल्या आहेत. भारतीय संघाच्या गोलंदाजीवर क्रिकेट फॅन्सचे विशेष लक्ष असणार आहे.