दक्षिण आफ्रिका T20 लीग(फोटो-सोशल मीडिया)
SA20 Season 4 : दक्षिण आफ्रिका टी 20 लीग लीगची काही महिन्यांनी सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिका T20 लीगचा चौथा सीझन 26 डिसेंबरपासून खेळवला जणार आहे. या स्पर्धेच्या प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे ठिकाण जाहीर केले गेले आहे. दक्षिण आफ्रिका टी 20 लीगचा अंतिम सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळवण्यात येणार आहे.
दुसरीकडे, किंग्जमीड, सेंचुरियन आणि वॉन्डरर्स प्लेऑफचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका टी 20 लीगमध्ये डर्बन पहिल्यांदाच प्लेऑफ सामना आयोजित करणार आहे. क्वालिफायर 1 सामना 21 जानेवारी रोजी डर्बनमध्ये खेळवण्यात येईल. जिथे लीगमधील दोन सर्वोत्तम संघ एकमेकांसोबत भिडणार आहेत. हायवेल्ड प्रदेश दोन महत्त्वाचे प्लेऑफ सामने आयोजित करणार असून ज्यामध्ये 22 जानेवारी रोजी सेंचुरियन येथे होणारा एलिमिनेटर सामना आणि 23 जानेवारी रोजी जोहान्सबर्गमधील वॉन्डरर्स येथे होणारा क्वालिफायर 2 सामना यांचा समावेश असणार आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिका टी 20 लीगचे सर्व अंतिम सामने प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आले आहेत.
दक्षिण आफ्रिका टी 20 लीगचे आयुक्त ग्रॅमी स्मिथ म्हणाले की, दक्षिण आफ्रिका टी 20 लीगचा चौथा सीझन यावर्षी खूपच रोमांचक असणार आहे. ही स्पर्धा बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) रोजी सुरू होणार आणि संपूर्ण सुट्टीच्या हंगामात चालणार आहे. लीगचे आयुक्त ग्रॅमी स्मिथ म्हणाले की, गेल्या वर्षी न्यूलँड्स स्टेडियमवरील पाच देखील सामने प्रेक्षकांनी भरलेले होते. यावेळी अंतिम सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. जो उत्तम हवामान, उत्तम मनोरंजन आणि उत्तम वातावरणात चॅम्पियन निश्चित करणार आहे.
डर्बनमध्ये पहिल्यांदाच प्लेऑफ सामना खेळवण्यात येणार आहे. ज्यामुळे चाहत्यांना अधिक मजा येणार आहे, कारण तो स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघांना आव्हान देणार आहे. सेंच्युरियन आणि वॉन्डरर्समध्ये गुरुवार आणि शुक्रवारी रात्री सामने होणार आहे. ज्यामुळे सलग सामन्यांसाठी ठिकाणे जवळ येण्यास मदत होणार आहेत.
गट टप्पा संपल्यानंतर फक्त दोन दिवसांनी प्लेऑफ सामने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे वेळापत्रक थोडे आव्हानात्मक असलेले दिसून येत आहे. ग्रॅमी स्मिथ म्हणाले की, यावेळी कोणते संघ अव्वल स्थानावर येतील हे त्यांना पाहावे लागणार आहे.
आता अंतिम आणि प्लेऑफ सामन्यांसाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्यामुळे चाहते त्यांच्या सुट्ट्यांचे नियोजन आरामात करू शकणार आहेत. ज्यामुळे दक्षिण आफ्रिका टी 20 लीग सामन्यांचा आनंद घेऊ शकतील.