Duleep Trophy: South Zone team announced for Duleep Trophy! Tilak Verma named captain
Duleep Trophy South Zone Team Announced: भारताच्या देशांतर्गत दुलीप ट्रॉफीसाठी दक्षिण विभागीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय खेळाडू तिलक वर्माच्या खांद्यावर बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धेसाठी दक्षिण विभागीय संघाचा कर्णधारपदाची जबाबादारी सोपवण्यात आली. पुढील महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेमध्ये तिलक वर्मा दक्षिण विभागीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
चार एकदिवसीय सामने आणि २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या २२ वर्षीय तिलकने नुकतीच इंग्लिश काउंटी संघ हॅम्पशायरकडून खेळताना प्रभावी कामगिरी केली आहे, त्यानेचार डावांमध्ये १००, ५६, ४७ आणि ११२ धावा करून आपला प्रभाव पाडला आहे. त्यानंतर त्याला कर्णधारपदी बसवण्यात आले. या स्पर्धेसाठी संघात रणजी ट्रॉफी फायनल खेळणाऱ्या केरळच्या संघातील चार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
१६ सदस्यीय दक्षिण विभागीय संघात केरळच्या मोहम्मद अझरुद्दीन, एमडी निधीश, बेसिल एनपी आणि सलमान निजार यांचा समावेश केला गेला आहे. मोहम्मद अझरुद्दीनकडे संघाचे उपकर्णधार देण्यात आले आहे. तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीसन आणि आर. साई किशोर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी, कर्नाटकचा देवदत्त पडिकल याचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.
भारत आणि कर्नाटकचा वेगवान गोलंदाज वैशाख विजयकुमार दक्षिण विभागाच्या गोलंदाजी आक्रमणाची धुरा वाहणार आहे. याशिवाय, मागील हंगामातील रणजी करंडकामध्ये कर्नाटकसाठी सर्वाधिक ५१६ धावा करून सर्वांना प्रभावित करणारा फलंदाज आर. स्मरन याला देखील संघात संधी देण्यात आली आहे. तथापि, स्मरन यांचा स्टँडबाय म्हणून समावेश केला गेला आहे.
या वर्षी दुलीप करंडक प्रादेशिक स्वरूपात असणार आहे. ज्यामध्ये सहा संघ असणार आहेत. दक्षिण विभाग, उत्तर विभाग, पूर्व विभाग, पश्चिम, मध्य, उत्तर-पूर्व विभागातील संघांचा यामध्ये समावेश असेल. चार दिवसांची ही स्पर्धा २८ ऑगस्टपासून बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर खेळवली जाणार आहे. उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये उत्तर विभाग पूर्व विभागाशी, तर मध्य विभाग उत्तर पूर्व विभागाशी दोन हात करणार आहे. दक्षिण विभाग आणि पश्चिम विभागाने उपांत्य फेरीत थेट प्रवेश निश्चित केला आहे.
दक्षिण विभाग संघ
तीलक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अझरुद्दीन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, तन्मय अग्रवाल, मोहित काळे, सलमान निझार, नारायण जगदीसन, टी. विजय (आंध्र), आर. साई किशोर, तनय त्यागराजन, विशाक विजयकुमार, एमडी निधिसिंग, निधिसिंग, एसपी गुरखे, एस.एन. कौठणकर. स्टँड बाय: मोहित रेडकर, आर. स्मरण, अंकित शर्मा,आंद्रे सिद्धार्थ, एडन ऍपल टॉम, शेख रशीद.