शुभमन गिल(फोटो-सोशल मिडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. इंग्लंडने भारताला पहिल्या डावात ३५८ धावांवर रोखले आहे. प्रतिउत्तरात इंग्लंडने सर्वबाद ६६९ धावा केल्या आणि ३११ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युउत्तरात भारताकडून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले. केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी चौथ्या दिवसाच्या अखेरचे ६० षटक खेळून काढत भारताला सामन्यात कायम राखले. पाचव्या दिवशी केएल राहुल बाद झाला.त्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. खेळीसह त्याने अनेक विक्रम मोडीत काढले आहे. अशातच त्याने एक मोठी कामगिरी केली आहे. मँचेस्टरमध्ये कसोटी शतक झळकावून गिलने कर्णधार म्हणून एका कसोटी मालिकेमध्ये चार शतके झळकावली आहेत. यासह त्याने सर डॉन ब्रॅडमन आणि महान सुनील गावस्कर यांची बरोबरी साधली आहे.
भारताचा युवा कर्णधार शुभमन गिल सद्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चौथे शतक झळकावले आहे. कर्णधार म्हणून गिलने डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावस्कर यांच्या कसोटी मालिकेत चार शतके झळकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासामध्ये इतर कोणत्याही कर्णधाराने कसोटी मालिकेत चारपेक्षा जास्त शतके झळकावलेली नाहीत.
शुभमन गिलने २० जून २०२५ रोजी लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी कर्णधारपदी पदार्पण केले होते. शुभमन गिलने लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात १४७ धावा फटकावल्या होत्या. २ ते ६ जुलै दरम्यान एजबॅस्टन येथे खेळवण्यात आलेल्या भारत-इंग्लंड मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात गिलने पहिल्या डावात २६९ आणि दुसऱ्या डावात १६१ धावांची खेळी खेळली होती. त्याच वेळी, रविवारी (२७ जुलै) मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारताच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात गिलने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये भारताचा कर्णधार म्हणून आपले चौथे शतक पूर्ण केले. भारतचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी एकूण ९ डावात ७३२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी चार शतके झळकावलीमी होती. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध २०५, १०७, १२० आणि १८२ धावांच्या खेळी साकारल्या होत्या.






