फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad
सनराइझर्स हैदराबाद : आयपीएल २०२५ चा आज ४५ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये खेळवला जात आहे. सध्या गुणतालिकेची स्थिती पहिली तर खालच्या तळाला सध्या सनराइझर्स हैदराबाद, राजस्थान रॅायल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघाची स्थिती सध्या खुपच खराब आहे. चेन्नईचा संघ दहाव्या स्थानावर आहे, तर राजस्थानचा संघ नवव्या स्थानावर आहे. हैदराबादच्या संघाने मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभुत केले होते. सध्या एक व्हिडीयो व्हायरल होत आहे, सीएसकेविरुद्धच्या पाच विकेट्सनी विजयानंतर, सनरायझर्स हैदराबाद संघ सुट्टीवर गेला आहे.
आयपीएलच्या मध्यात हैदराबादचा हा निर्णय आश्चर्यकारक आहे. तथापि, फ्रँचायझीने स्वतः त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती दिली आहे. सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये, सनरायझर्स हैदराबादचा संघ भारताच्या शेजारील देश मालदीवमध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी गेला आहे. व्हिडिओमध्ये, संघातील खेळाडू विमानतळावरून बाहेर पडून समुद्रकिनाऱ्यावर चालताना दिसत आहेत.
A warm welcome for our Risers in Maldives for their team bonding retreat 🏖️🧡 pic.twitter.com/wirokoXuFb
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 27, 2025
खरंतर, हैदराबादचा पुढचा सामना एका आठवड्यानंतर आहे. २५ एप्रिलनंतर, संघाला आता त्यांचा पुढचा सामना २ मे रोजी खेळायचा आहे. पुढच्या सामन्यात पॅट कमिन्सचा संघ गुजरात टायटन्सशी सामना असणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. एका आठवड्याचा वेळ वापरण्यासाठी आणि प्लेऑफचा ताण कमी करण्यासाठी, हैदराबाद संघाने प्रवास करण्याची योजना आखली. सध्याच्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. या हंगामात संघाने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत ज्यापैकी फक्त ३ सामने जिंकले आहेत. ६ गुणांसह, तो पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे.
MI vs LSG : वानखेडेवर आज लखनऊला कमबॅक करण्याची संधी! LSG ने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२५ ची सुरुवात धमाकेदार केली. पहिल्याच सामन्यात संघाने राजस्थान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव केला. तथापि, यानंतर संघाला चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पंजाब आणि सीएसके विरुद्ध विजय मिळाले.
हैदराबादचे 5 सामने शिल्लक आहेत, हे सर्व सामने संघाला जिकणे अनिवार्य आहेत. पुढील सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. त्यानंतर 5 मे ला दिल्ली कपिटल्सशी सामना खेळवला जाणार आहे. 10 मे रोजी कोलकताशी सामना होणार आहे, 13 तारखेला रॅायल चॅलेंरर्स बंगळुरु यांच्याशी लढत पाहायला मिळणार आहे. हैदराबादचा शेवटचा सामना लखनऊ सुपर जांयट्स यांच्याशी होणार आहे.