फोटो सौजन्य - Lucknow Super Giants/Mumbai Indians
MI vs LSG Toss Update : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना सुरु झाला. हा सामना वानखेडेवर होणार आहे, आयपीएल २०२५ चा हा ४५ वा सामना खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो संघ आज टॉप ४ मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी होईल. सध्या मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा त्याचबरोबर सूर्यकुमार यादव दमदार फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.
लखनौ सुपर जायंट्सच्या संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. आजच्या सामन्यात शार्दूल ठाकूर याला संघाबाहेर काढण्यात आले आहे त्याच्या जागेवर मयंक यादव याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे. आज मयंक यादव दुखापतीनंतर आयपीएलमध्ये पहिला सामना खेळणार आहे आज त्यांच्या कामगिरीवर नजर असणार आहे. त्यांचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये देखील आज बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह आज इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघामध्ये खेळणार आहे. त्याच्या जागेवर आज कॅम्ब्रिन बॉशला संघामध्ये स्थान मिळाले आहे.
🚨 Toss 🚨@LucknowIPL won the toss and elected to field against @mipaltan
Wankhede, get ready for a special #ESA Day 🙌
Updates ▶ https://t.co/R9Pol9Id6m #TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/o04phGJdnO
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना सुरु झाला आहे. आजच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आज १९००० हजार लहान शाळेतील मुले आली आहेत. सामन्याआधी सर्व लहान मुलांनी आज त्यांच्या आवडत्या हिरोसाठी पेंटिंग देखील बनवले होते, त्यामुळे आजच्या सामन्यात मैदानावर मुंबई इंडियन्सचे लहान समर्थक पाहायला मिळणार आहेत.
KKR vs PBKS : पावसामुळे सामना रद्द, कोणत्या संघाला केलं विजयी घोषित? वाचा संपूर्ण माहिती
हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, रायन रिकाल्टन (विकेटकिपर), विल जॅकस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, कॅम्ब्रिन बॉश, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा
इम्पॅक्ट प्लेयर – जसप्रीत बुमराह, राज अंगद बावा, रिस टॉली, रॉबिन मिंज, सत्यनारायण राजू
एडन मार्करम, रिषभ पंत (विकेटकिपर/कर्णधार), मिचेल मार्श, निकलस पुरन , आयुष बडोनी, अब्दुल समद, दिग्वेश राठी, आवेश खान, रवी बिश्नोई, प्रिंस यादव, मयंक यादव
इम्पॅक्ट प्लेयर – डेव्हिड मिलर, युवराज चौधरी, शाहबाझ अहमद, हिम्मत सिंह, आकाश सिंह