फोटो सौजन्य - Gujarat Titans सोशल मीडिया
Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Playing 11 : आयपीएल २०२५ च्या १९ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. हैदराबाद आणि गुजरात यांच्यामधील सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. चालू हंगामात, गुजरात टायटन्स संघ २ विजय आणि ३ पराभवांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे, तर हैदराबाद संघ पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. हैदराबाद संघाने चालू हंगामात आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. आता, त्यांच्या घरच्या मैदानावर, हैदराबाद प्लेइंग-११ मध्ये काही बदलांसह गुजरातला हरवण्याचा प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सचे संभाव्य प्लेइंग-११ कोणते असू शकते ते जाणून घेऊया?
सनरायझर्स हैदराबाद गुजरात टायटन्स यांच्यामधील आयपीएल २०२५ चा १९ वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना ६ एप्रिल २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे, या सामान्यांच्या अर्ध्या तासाआधी नाणेफेक होईल. या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइट होणार आहे तर या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८/स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहेत.
सनरायझर्स हैदराबाद गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आतापर्यत ४ सामने खेळवण्यात आले आहे. यामध्ये १ सामन्यात हैदराबादने विजय मिळवला आहे तर ३ वेळा गुजरात टायटन्सने विजय मिळवला आहे.
HEAD vs SIRAJ. New ball. 🥶
The last time these two clashed on the cricket field, it made headlines! 👀#IPLonJioStar 👉 #SRHvGT | SUN, 6th APR, 6:30 PM on Star Sports Network & JioHotstar pic.twitter.com/oYCkrskicm
— Star Sports (@StarSportsIndia) April 6, 2025
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाज भरपूर धावा काढताना दिसतात. हे एक उच्च स्कोअरिंग स्थळ आहे. येथे टी-२० मध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २३० आहे, तर आयपीएलच्या चालू हंगामात येथे आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी एक सामना धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकला आणि एक सामना गतविजेत्या संघाने जिंकला. राजीव गांधी स्टेडियमवर एकूण ७९ आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३५ वेळा विजय मिळवला आहे, तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने ४४ सामने जिंकले आहेत.
IPL 2025 च्या लिलावात बोली लागली नाही, आता खेळाडूने ठोकलं त्रिशतक, 19 वर्षांचा जुना विक्रम मोडला
सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), कामिंदू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, सिमरजीत सिंग, मोहम्मद शमी, जीशान अन्सारी.
प्रभावशाली खेळाडू: ट्रॅव्हिस हेड
साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा.
प्रभावशाली खेळाडू: शेरफेन रदरफोर्ड