Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s T20 World Cup 2026: मोठा उलटफेर! श्रीलंकेने न्यूझीलंडला हरवून रचला इतिहास; नीलाक्षिका सिल्वाचा मास्टरक्लास

Sl W beat NZ W In World Cup 2026: विश्वचषक स्पर्धेत मध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला, साउदम्प्टन येथे श्रीलंकेने न्यूझीलंडचा 5 विकेट्सने पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 17, 2026 | 03:43 PM
Women’s T20 World Cup 2026: मोठा उलटफेर! श्रीलंकेने न्यूझीलंडला हरवून रचला इतिहास; नीलाक्षिका सिल्वाचा मास्टरक्लास
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेने न्यूझीलंडला हरवून रचला इतिहास
  • नीलक्षिका सिल्वाचा मास्टरक्लास
  • न्यूझीलंडचा सलग पराभव
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत ( ICC Womens T20 World Cup 2026) स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. साउदम्प्टन येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचा पाच विकेट्सने पराभव केला. ‘गट ब’ मधील या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ६ विकेट्स गमावून १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेने दोन चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य पूर्ण केले. नीलक्षिका सिल्वाच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. तिने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३७ चेंडूंमध्ये नाबाद ५४ धावा केल्या. विकेटकीपर कौशानी नुथ्यांगनाने तिच्यासोबत एक महत्वपूर्ण भागीदारी केली आणि १४ चेंडूंमध्ये नाबाद २४ धावा केल्या. कर्णधार चमारी अटापट्टूनेही २७ धावा केल्या. श्रीलंकेसाठी हा विजय ऐतिहासिक आहे, कारण टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडला पराभूत करण्याची श्रीलंकेची ही पहिलीच वेळ आहे.

Women’s T20 World Cup मध्ये भारताचा दुसरा सामना आज; सेमीफायनलवर टीम इंडियाची नजर, पाहा नेदरलँड्सविरुद्ध संभाव्य Playing 11

श्रीलंकेचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय

न्यूझीलंडच्या १५१ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेने चांगली सुरुवात केली. अटापट्टू आणि विश्मी गुणरत्ने यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. पण त्यानंतर संघाची फलंदाजी अडखळली. त्यानंतर नीलाक्षिका आणि कविशा दिलहरी यांनी पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. ही भागीदारी तुटल्यानंतर, नीलाक्षिका आणि कौशानी नुथ्यांगना यांनी जोरदार फलंदाजी करत संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. नीलाक्षिका ३७ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह ५४ धावांवर नाबाद राहिली. कौशानी २४ धावांवर नाबाद राहिली, तर चमारीने २७ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून, नॅन्सी पटेलने दोन विकेट्स घेतले, तर ब्री एलिंगने एक विकेट घेतला.

Jubilant scenes in Birmingham! 🎉🇱🇰#NilakshikaSilva‘s brilliant fifty guides #SriLanka to a memorable win over the defending champions! 👏🔥 UP NEXT: ICC Women’s #T20WorldCup 2026 | #ENGvIRE | LIVE NOW 👉 https://t.co/ruxbLg3mUK pic.twitter.com/0CJdaBngCZ — Star Sports (@StarSportsIndia) June 16, 2026

न्यूझीलंडचा सलग पराभव

न्यूझीलंडच्या इसाबेला गेज आणि जॉर्जिया प्लायमर यांनी डावाची सुरुवात केली. न्यूझीलंडची कर्णधार अमेलिया केर आणि सोफी डिव्हाईन यांनी प्रत्येकी ४५ धावा करून संघाला १५० धावांपर्यंत पोहोचवले,उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या अमेलिया केरचे अर्धशतक हुकले, तिने ३६ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह ४५ धावा केल्या. त्यानंतर ब्रुक हॅलिडे सात धावा करून बाद झाली. सोफी डिव्हाईननेही ३० चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅडी ग्रीन १८ धावांवर नाबाद राहिली, तर जेस केरनेही सहा धावा केल्या. संपूर्ण संघ २० षटकांत केवळ १५० धावाच करू शकला, जी धावसंख्या श्रीलंकेसाठी खूपच कमी ठरली. श्रीलंकेकडून, मिताली अयोध्याने ४ षटकांत २४ धावा देऊन १ विकेट घेतला. कविशा दिलहरीने २ विकेट्स घेतले. अटापट्टू, सुगंधिका आणि निमाशा मीपेज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतले.

दोन्ही संघातील ११ खेळाडू:

श्रीलंका: चामारी अटापट्टू (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, नीलाक्षीका सिल्वा, कौशानी नुथ्यांगना (यष्टीरक्षक), सुगंधिका कुमारी, काव्या कविंदी, मिताली अयोध्या, मिताली ए.

न्यूझीलंड: इसाबेला गेज (यष्टीरक्षक), जॉर्जिया प्लायमर, अमेलिया केर (कर्णधार), सोफी डिव्हाईन, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इझी शार्प, जेस केर, नॅन्सी पटेल, रोझमेरी मेयर, ब्री एलिंग.

IND vs AFG Second ODI Live: अफगाणिस्तानचा टॉस जिंकून मोठा निर्णय, टीम इंडियात तीन बदल; प्रिन्स यादवची एन्ट्री

Web Title: Sri lanka vs new zealand womens t20 world cup 2026 historic win nilakshika silva masterclass

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • New Zealand cricket team
  • sri lanka cricket team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.