
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
पाकिस्तानची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन मालिका पार पडली. यामध्ये पहिली मालिका ही एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती तर दुसरी मालिका ही टी20 मालिका खेळवण्यात आली होती. दोन्ही मालिकांमध्ये पाकिस्तानच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आणि मालिका नावावर केल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची दमदार कामगिरी पहायला मिळाली तर संघाने आशिया कपमध्ये फायनलच्या पराभवानंतर चांगली कामगिरी करुन दाखवली.
पाकिस्तान क्रिकेट संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात तिरंगी मालिका होईल, ज्याचे आयोजन पाकिस्तान करणार आहे. पाकिस्तानने एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी आपले संघ जाहीर केले आहेत, ज्यामध्ये अनेक खेळाडूंना संधी मिळत आहेत तर काहींना वगळण्यात आले आहे.
एकदिवसीय आणि तिरंगी मालिकेसाठी पाकिस्तान संघात हसन नवाजचा समावेश नव्हता. त्याला पाकिस्तानी संघातून वगळण्यात आले आहे आणि तो आता देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळेल. टी-२० संघात हसनच्या जागी फखर जमानची निवड झाली आहे. नवाजचा फॉर्म घसरला आहे, त्यामुळे तो आता कायद-ए-आझम ट्रॉफीमध्ये खेळेल.
पाकिस्तानने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली, ज्यामुळे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकली. शाहीन आफ्रिदीच्या कर्णधारपदाने पाकिस्तानसाठी इतिहास रचला. त्याच्या आधी कोणत्याही पाकिस्तानी कर्णधाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका जिंकली नव्हती. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठीही आफ्रिदी संघाचे नेतृत्व करेल.
शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फैसल अक्रम, फखर जमान, हरिस रौफ, हसीबुल्ला, हुसैन तलत, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सैम अयुब, सलमान अली आगा.
सलमान अली आगा (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान (यष्टीरक्षक), उस्मान खान (विकेटकीपर).