फोटो सौजन्य - Gujarat Titans सोशल मीडिया
Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Match Report : हैदराबादचा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादच्या संघाला गुजरात टायटन्सने त्यांच्या घरच्या मैदानावर ७ विकेट्सने पराभूत केले आहे. या सामन्यामध्ये हैदराबादच्या संघाने पराभवाचा चौकार पार केला आहे. तर गुजरात टायटन्सच्या संघाने विजयाच्या हॅट्रिक नावावर केली आहे. या स्पर्धेचा हैदराबादचा हा सलग चौथा पराभव आहे. त्याचबरोबर त्यांचा गुणतालिकेमधील रनरेट हा आणखीनच खाली आला आहे.
हैदराबादच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर ट्रॅव्हिस हेड आणखी एक सामन्यात फेल ठरला त्याने ५ चेंडू खेळले आणि ८ धावा करून त्याला मोहम्मद सिराजने बाहेरचा रस्ता दाखवला. अभिषेक शर्मा ने हैदराबादचे झालेले चारही सामान्यांमध्ये अत्यंत अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. या सामन्यात देखील त्याने १८ धावा केल्या आणि सिराजने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ईशान किशनने राजस्थान रॉयल्स विरोध शतक झळकावले होते त्यानंतर झालेल्या तीनही सामन्यात त्याची बॅट शांत राहिली. नितीश कुमार रेड्डीने संघासाठी ३४ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या, तर हेनरिक क्लासेनने संघासाठी १९ चेंडूमध्ये २७ धावा केल्या. अनिकेत वर्माने संघासाठी १४ चेंडूमध्ये १८ धावा केल्या.
Glorious shots on display 🫡
Captain Shubman Gill led from the top and remained unbeaten with a well constructed innings of 61(43) 👏
Scorecard ▶ https://t.co/Y5Jzfr7tkC#TATAIPL | #SRHvGT | @ShubmanGill pic.twitter.com/1CWQU5gd82
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2025
हैदराबादच्या संघासाठी पॅट कमिन्सने देखील धावा केल्या पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. पॅट कमिन्सने संघासाठी ९ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. या हैदराबादचा आयपीएल २०२५ मधील सलग चौथा पराभव आहे. गुजरातच्या संघाने फक्त गोलंदाजीमध्येच कमाल दाखवली नाही तर फलंदाजीमध्ये सुद्धा कहर केला.
गुजरात टायटन्सच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर संघाचा कर्णधार शुभमन गिलने संघासाठी ४३ चेंडूंमध्ये ३१ धावा करत नाबाद राहिला. तर वॉशिंग्टन सुंदरीने संघासाठी २९ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर बाद झाल्यानंतर शेवटच्या काही ओव्हरमध्ये शेरफन रुदरफर्ड याने संघासाठी मोठे शॉट मारून १६ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या.
मोहम्मद सिराजने आज त्याच्या होमग्राउंडवर कौतुकास्पद कामगिरी करून मैदानावर कहर केला. त्याने ट्रॅव्हिस हेड, अभिषेक कुमार, अनिकेत वर्मा आणि सिमरजित सिंह यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आज सिराजने हैदराबादच्या मैदानावर संघासाठी चार विकेट्स घेतले. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले.