फोटो सौजन्य – X (BCCI)
On this day, the Indian team won the T20 World Cup 2024 : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे, भारताच्या संघाने या दिनी ११ वर्षानंतर T20 विश्वचषक नावावर केला होता आणि इतिहास रचला होता. यामध्ये अंतिम सामन्यामध्ये भारताच्या संघाने गमावलेला सामना जिंकुन जेतेपद नावावर केले होते. बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने १७ वर्षांनी टी-२० विश्वचषक जिंकला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंचे डोळे पाणावले.
भारताचा टी20 संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि कोहली एकमेकांना मिठी मारताना पाहुन चाहते भावुक झाले. यादरम्यान संपूर्ण देश भावुक झाला. त्या विजयाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. भारतीय संघाचा टी-२० विश्वचषकात अ गटात समावेश होता ज्यामध्ये पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा यांचाही समावेश होता. भारताने अमेरिकेत गट टप्प्यातील सर्व सामने खेळले. ५ जून रोजी संघाने आयर्लंडवर ८ विकेट्सने विजय मिळवला. ९ जून रोजी न्यू यॉर्कमध्ये त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला.
भारत – पाकिस्तान यांच्यात होणार लढत! आशिया कपच्या तारखेबाबत मोठी अपडेट
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे कोट्यवधी भारतीय चाहते दु:खी झाले होते, तर हे दुःख रोहित शर्माच्या मनात कुठेतरी होते. त्यानंतर २०२४ च्या टी-२० विश्वचषकात कर्णधार रोहित शर्मा वेगळ्याच शैलीत दिसला. रोहित शर्मा या स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा, सर्वाधिक अर्धशतके, एका डावात सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणारा फलंदाज होता.
𝟮𝟵.𝟬𝟲.𝟮𝟬𝟮𝟰 🗓️
Do you remember what 𝙀𝙪𝙥𝙝𝙤𝙧𝙞𝙖 feels like?
Relive that Champions feeling with the Champions 😇
One year of celebrating pride, glory, and togetherness 🇮🇳🏆#TeamIndia pic.twitter.com/PubQhonxeM
— BCCI (@BCCI) June 29, 2025
२०२४ च्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्माने २५७ धावा केल्या, त्यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १५६.७० होता. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक ९२ धावा केल्या. इतकेच नाही तर रोहितने या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक ३ अर्धशतके केली. याशिवाय रोहितने स्पर्धेत २४ चौकार आणि १५ षटकार मारले.
टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. तेव्हापासून, टीम इंडियाने विराट किंवा रोहितच्या नेतृत्वाखाली कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १३ वर्षांनी टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली. रोहित शर्मा टीम इंडियासाठी आयसीसी ट्रॉफी जिंकणारा चौथा कर्णधारही ठरला. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर, टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.