
खेळाडू ज्यांना T20 विश्वचषकात संधी मिळाली नाही (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे विश्वचषक होणार आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला संघातून वगळण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, मजबूत रेकॉर्ड असलेले काही खेळाडू वगळण्यात आले आहेत. या खेळाडूंना का घेण्यात आले नाही याचीही आता चर्चा रंगली आहे. २०२५ मध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारा खेळाडू म्हणून शुभमन गिलकडे पाहिले जात असतानाही त्याला वगळण्यात आले आहे. सध्या त्याच्या तब्बेतीचे कारण पुढे येत आहे. मात्र अन्य काही खेळाडू चांगले असूनही त्यांना ही संधी मिळाली नाही त्याबाबत आपण जाणून घेऊया.
यशस्वी जयस्वाल
यशस्वी जयस्वालचीही टी२० च्या भारतीय संघात निवड झाली नाही. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी २२ डावांमध्ये ७२३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३६ आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट १६४ आहे. गेल्या टी-२० विश्वचषकात तो बॅकअप ओपनर होता पण यावेळी त्याला वगळण्यात आले.
मोहम्मद सिराज
भारतीय टीममधील हमखास विकेट घेणारा म्हणून ओळख असणारा मोहम्मद सिराज गेल्या टी-२० विश्वचषकात विजेत्या संघाचा भाग होता. त्याला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधीही मिळाली होती. वेस्ट इंडिजच्या लेगमधील खेळपट्टी आणि परिस्थितीमुळे त्याला बाहेर बसावे लागले. मात्र सिराज आता या वेळी संघाचा भाग नाही.
रवी बिश्नोई
टीम इंडियाकडे कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे दोन प्रमुख फिरकी गोलंदाज आहेत. त्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि म्हणूनच पहिल्या क्रमांकावर असलेल्या रवी बिश्नोईला स्थान मिळालेले नाही. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. मात्र टी२० संघामध्ये त्याला संधी देण्यात आलेली नाही.
जितेश शर्मा
जितेश शर्मा आशिया कपमध्ये संघाचा भाग होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने फलंदाजीतूनही चांगली कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन डावांमध्ये त्याने ५ चेंडूत १० धावा आणि १७ चेंडूत २७ धावा केल्या. तरीही त्याला संघातून वगळण्यात आले. अन्य खेळाडूंच्या तुलनेत जितेशची कामगिरी झाकोकळी गेली असल्याने त्याला संंघात स्थान मिळालेले नाही.
ऋषभ पंत
ऋषभ पंत गेल्या टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. त्याने या वर्षी एकही टी-२० सामना खेळलेला नाही. सुरुवातीला, कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पंतला टी-२० संघात स्थान मिळू शकले नाही. आता तो जवळजवळ पूर्णपणे संघाबाहेर आहे. त्याशिवाय त्याला झालेली दुखापत हेदेखील एक कारण असू शकते. दरम्यान ऋषभच्या चाहत्यांना त्याला या सामन्यांमध्ये पाहता येणार नाही.
Ans: 7 फेब्रुवारी, 2026 पासून विश्वचषकाला सुरूवात होईल
Ans: गतविजेता भारत, श्रीलंकेसह, आगामी आवृत्तीचे सह-यजमानपद देखील भूषवेल. २०२६ ची आवृत्ती ही १० वी पुरुष टी२० विश्वचषक असेल आणि त्यात २० संघांचा समावेश असेल, ज्यांना गट टप्प्यासाठी पाच-पाच जणांच्या चार समान गटांमध्ये विभागण्यात आले आहे
Ans: या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी भर दिला की हा निर्णय गिलच्या गुणवत्तेचे प्रतिबिंब नाही, तर भारत ज्या रचनेचे पालन करण्यास उत्सुक आहे त्याचे प्रतिबिंब आहे