फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
BCCI announces India squad for T20 World Cup : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये काल टी20 मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताच्या संघाने दमदार कामगिरी केली आणि बाजी मारली आहे. तर आता टी20 विश्वचषक 2026 ला फक्त 49 दिवस शिल्लक असताना आज बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारताच्या संघाने टीम इंडियाची कमान हि सुर्यकुमार यादवकडेच असणार आहे हे स्पष्ट केले होते. भारताच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2024 चा विश्वचषक नावावर केला होता.
त्यामुळे भारताच्या संघासमोर घरच्या मैदानावर विश्वचषक खेळणे हे नक्कीच आव्हान असणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघामध्ये सुर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे, तर अक्षर पटेल या संघाचे उपकर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. भारतीय सलामीवीर फलंदाजांमध्ये रोहित शर्माच्या निवृतीनंतर अभिषेक शर्माने आतापर्यत कमालीची कामगिरी केली आहे. तर संजू सॅमसन हा त्याच्यासोबत ओपनिंग करताना दिसेल. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला बऱ्याचदा तिलक वर्मा आणि सुर्यकुमार यादव दोघे येताना दिसले आहेत.
पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये तिलक वर्माने कमालीची फलंदाजी केली होती, त्याचबरोबर सुर्या देखील फार काही चांगली कामगिरी मागील काही महिन्यापासून केली नाही त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. हार्दिक पांड्याने भारतीय संघामध्ये दमदार कमबॅक केला आहे, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये गोलंदाजीमध्ये तर कमाल केलीच त्याचबरोबर फलंदाजीमध्ये देखील त्याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. शिवम दुबे त्याच्या उंच षटकारासाठी ओळखला जातो पण त्याने मागील काही सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये देखील सर्वांना चकीत केले आहे.
शुभमन गिल याला संघामधून वगळण्यात आले आहे, त्याच्या जागेवर इशान किशन याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर रिंकू सिंह देखील भारतीय संघाचा भाग असणार आहे. रिंकूला मागील 2024 मध्ये देखील संघामध्ये स्थान मिळाले होते पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अक्षर पटेल हा भारतीय संघाची उपकर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे.
फिरकी गोलंदाजांमध्ये भारताच्या संघाने वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, यांना संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदिप सिंह, जसप्रीत बूमराह, हर्षित राणा हे संघाचा भाग असणार आहेत. भारतीय संघासाठी अष्टपैलूची भूमिका ही हार्दिक पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल यांच्याकडे असणार आहे. तर विकेटकिपर म्हणून संजू सॅमसन आणि इशान किशन हे खेळताना दिसणार आहेत.
अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बूमराह, हर्षित राणा, कुलदीप यादव, अक्षर पटेल (उपकर्णधार), इशान किशन, रिंकू सिंह.
अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बूमराह, हर्षित राणा, कुलदीप यादव, अक्षर पटेल (उपकर्णधार), इशान किशन, रिंकू सिंह.






