
UAE's squad for the T20 World Cup 2026 announced! Mohammad Waseem to lead the team; 'These' players have struck it lucky.
UAE squad announced for the T20 World Cup : टी-२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला काही दिवसच शिल्लक असताना जवळजवळ सर्व देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. दरम्यान यूएई संघाची घोषणा करण्यात आली आहे. यूएईचा स्टार फलंदाज मोहम्मद वसीम २०२६ च्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकात संघाची धुरा वाहताना दिसणार आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवण्यात येणार आहे.
यूएई संघात २०२२ च्या टी-२० विश्वचषकातील तीन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. त्यापैकी मोहम्मद वसीमची कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली आहे. त्याने ६६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. तर अलिशान शराफू आणि जुनैद सिद्दीकी हे देखील २०२२ च्या विश्वचषक संघाचा भाग राहिले होते.
माजी भारतीय खेळाडू लालचंद राजपूत हे संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. ज्याचे नेतृत्व सपोर्ट स्टाफ करतो, ज्यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज यासिर अराफत हा जलद गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. आयर्लंड मालिका आणि त्यानंतरच्या टी-२० विश्वचषकादरम्यान ते यूएई संघासोबत असणार आहेत. झिम्बाब्वेचे स्टॅनली चिओझा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी बघणार सांभळताना दिसणार आहे.
मागील वर्षी ओमानमध्ये झालेल्या आशिया आणि पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता फेरीच्या सुपर सिक्स टप्प्यात जपानला पराभूत करत यूएईने स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले होते. संघाचा हा तिसरा टी-२० विश्वचषक सामना असणार आहे. यापूर्वी, यूएई २०१४ आणि २०२२ मध्ये स्पर्धेत खेळला होता, परंतु गट टप्प्याच्या पुढे जाण्यास मात्र संघाला अपयश आले होते.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी यूएईला गट डी मध्ये समावेश करण्यात आला आहे. संघ आपला पहिला सामना १० फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर कॅनडा (१३ फेब्रुवारी), अफगाणिस्तान (१६ फेब्रुवारी) आणि दक्षिण आफ्रिका (१८ फेब्रुवारी) विरुद्ध नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सामने होणार आहेत.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी२० विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडचा मोठा डाव! ‘या’ वेगवान गोलंदाजाला दिली ताफ्यात जागा
विश्वचषकापूर्वी, यूएई संघ आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर संघाचे ३ आणि ६ फेब्रुवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर नेपाळ आणि इटलीविरुद्ध सराव सामने होणार आहेत.
मोहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, आर्यनश शर्मा (यष्टीरक्षक), ध्रुव पराशर, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मयंक कुमार, मोहम्मद अरफान, मोहम्मद फारूक, मोहम्मद जवादुल्लाह, मोहम्मद जोहैब, रोहिद खान, सोहैब खान आणि सिमरनजीत सिंग.