Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वचषक महत्त्वाची भूमिका बजावणार! क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेला आदर मिळवून देण्याचा कर्णधार रझाचा निर्धार 

झिम्बाब्वे संघ येत्या टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी करून जागतिक क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व पुन्हा स्थापित करेल असा विश्वास झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 06, 2026 | 04:51 PM
The World Cup will play a crucial role! Captain Raza is determined to earn respect for Zimbabwe in cricket.

The World Cup will play a crucial role! Captain Raza is determined to earn respect for Zimbabwe in cricket.

Follow Us
Close
Follow Us:

Captain Raza’s statement regarding the World Cup : टी-२० विश्वचषकाला काही दिवस बाकी असताना सर्वच संघ या मोठ्या स्पर्धेसाठी चांगलेच तयारीला लागले आहे. अनेक संघांनी आपापले संघ देखील जाहीर केले आहेत. दरम्यान, काही काळापासून संघर्ष करत असलेला झिम्बाब्वे संघ येत्या टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी करून जागतिक क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व पुन्हा स्थापित करू शकेल, असा विश्वास झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझाने व्यक्त केला आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत माजी विजेत्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यासोबत झिम्बाब्वेला गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे, तर आयर्लंड आणि ओमान देखील त्याच गटात आहेत.

टी-२० विश्वचषका

हेही वाचा : AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथने तोडली ‘भारताची भिंत’! राहुल द्रविडला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास; वाचा सविस्तर

रविवारच्या पार्ल रॉयल्स आणि एमआय केपटाऊन यांच्यातील सामन्यानंतर एसए २० ने आयोजित केलेल्या संभाषणात रझा म्हणाला, विश्वचषक प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. मला नेहमीच असे वाटते की जागतिक क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेला अधिक आदर मिळवून देण्यात विश्वचषक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. एमआय केपटाऊनवर सात विकेटने विजय मिळवताना रझा यांनी रॉयल्ससाठी चार विकेट घेतल्या. आम्हाला ताठ मानेने परतता येईल आणि आमच्या देशवासियांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी करायची आहे. आम्हाला निकालांची जास्त काळजी नाही.

लीग स्पर्धा वर्ल्डकपसाठी ठरताहेत फायद्याच्या

विश्वचषकापूर्वी एसए२० आणि आयएलटी २० मध्ये खेळल्याने त्याच्या खेळाडूंना खूप मदत होईल. आपण जितके जास्त खेळू शकतो तितके चांगले. आयएलटी२० मध्ये झिम्बाब्वेचे तीन क्रिकेटपटू देखील सहभागी होतात. रझा त्याचा धाकटा भाऊ मोहम्मद महिदीच्या अकाली निधनानंतर येथे खेळण्यासाठी आला आहे. एसए २० मध्ये खेळणारा झिम्बाब्वेचा पहिला क्रिकेटपटू रझा म्हणाला, माझ्या आयुष्याचा तो भाग नेहमीच कठीण असेल, पण मी मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तयार नसतो तर मी इथे आलो नसतो. मला वाटले की मी योगदान देऊ शकतो, म्हणून मी इथे आलो.

हेही वाचा : मुस्तफिजूर रहमान IPL वाद! कोणाच्या आदेशावरून बांगलादेशच्या गोलंदाजाला दाखवला बाहेरचा रस्ता

स्टीव्ह स्मिथने मोडला राहुल द्रविडचा विक्रम

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने इतिहास रचला आहे. पाचव्या कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात शतक झळकावून स्मिथने भारताचा माजी कर्णधार दिग्गज राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या शतकासह, स्टीव्ह स्मिथच्या कसोटी कारकिर्दीत आता ३७ शतके जमा झाली असून स्मिथने या बाबतीत राहुल द्रविडला मागे टाकले आहे. राहुल द्रविडने त्याच्या खेळण्याच्या काळात एकूण ३६ शतके ठोकली आहेत. द्रविडने १६४ कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याने ३६ वेळा १०० धावांचा टप्पा पार केला आहे. तर स्मिथने त्याच्या १२३ व्या कसोटी सामन्यात शतक ठोकून राहुल द्रविडला पिछाडीवर टाकले.

Web Title: T20 world cup 2026 captain raza is determined to earn respect for zimbabwe in cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • T20 World Cup 2026
  • Zimbabwe cricket team

संबंधित बातम्या

बांगलादेशमध्ये  IPL चे थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंगवर बंदी…बीसीसीआयला मोठे नुकसान होईल का? वाद चिघळला
1

बांगलादेशमध्ये IPL चे थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंगवर बंदी…बीसीसीआयला मोठे नुकसान होईल का? वाद चिघळला

ICC च्या प्रतिसादानंतरच बांग्लादेश पुढील पाऊल उचलणार, 2026 च्या T20 विश्वचषकाबाबत सस्पेन्स कायम
2

ICC च्या प्रतिसादानंतरच बांग्लादेश पुढील पाऊल उचलणार, 2026 च्या T20 विश्वचषकाबाबत सस्पेन्स कायम

T20 World Cup 2026 : जय शाह बांग्लादेशच्या मागण्या पूर्ण करतील का? आयसीसीच्या निर्णयापूर्वी महत्त्वाची अपडेट
3

T20 World Cup 2026 : जय शाह बांग्लादेशच्या मागण्या पूर्ण करतील का? आयसीसीच्या निर्णयापूर्वी महत्त्वाची अपडेट

बांगलादेशचा भारतात T20 World Cup खेळण्यास स्पष्ट नकार; ICC ला पत्र लिहून व्यक्त केली मोठी भीती
4

बांगलादेशचा भारतात T20 World Cup खेळण्यास स्पष्ट नकार; ICC ला पत्र लिहून व्यक्त केली मोठी भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.