मुस्तफिजूर रहमान(फोटो-सोशल मीडिया)
Mustafizur Rahman Controversy : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळण्याने वादाला तोंड फुटले आहे. त्याला आयपीएल बाहेर करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतलेला नव्हता. एका वृत्तानुसार, या मुद्द्यावर बीसीसीआय किंवा आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यांशी चर्चा देखील झाली नव्हती. कोलकाता नाईट रायडर्सना मुस्तफिजूर रहमानला त्यांच्या संघातून ताबडतोब सोडण्याचे आदेश देऊन वरच्या स्तरावरून थेट आदेश आला आणि या निर्देशाचे पालन देखील केले गेले.
हेही वाचा : AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथ बनला अॅशेसचा शतकवीर, इंग्लिश दिग्गजाचा मोडला विक्रम! डॉन ब्रॅडमन अजूनही आघाडीवर
इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, या निर्णयामुळे बांगलादेशने आगामी महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतात जाण्यास नकार देण्यात आला आहे. बोर्डाच्या सर्वोच्च स्तरावर हा निर्णय घेतला गेल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून वृत्तपत्राला सांगण्यात आले की, “आम्हाला स्वतः माध्यमांद्वारे याबद्दल माहिती मिळाली. कोणतीही चर्चा झाली नाही आणि आमचे मत देखील मागण्यात आले नाही.”
बीसीसीआय सचिव काय म्हणाले?
या संदर्भात बोर्डाची एक बैठक देखील झाली? किंवा मुस्तफिजूरच्या प्रकरणाबद्दल आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला माहिती दिली होती का? या प्रश्नांना बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया सामोरे जाऊन त्यांनी उत्तर देणे टाळले. तथापि, शनिवारी बोर्डाची भूमिका स्पष्ट करण्यात आली तेव्हा सैकिया म्हणाले की, अलिकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयकडून केकेआर फ्रँचायझीला त्यांच्या बांगलादेशी मुस्तफिजूर रहमानला संघातून सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
सोमवारी, बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देशातील आयपीएल सामन्यांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की मुस्तफिजूरला आयपीएलमधून वगळण्याच्या निर्णयामुळे बांगलादेशच्या लोक दुखावले गेले आहेत, तसेच त्यांना राग देखील आला आहे. “म्हणून, निर्देशानुसार, सर्व इंडियन प्रीमियर लीग सामने आणि कार्यक्रमांचे प्रसारण थांबवण्याची विनंती करण्यात येत आहे.” असे एका निवेदनात सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्याचा मोठा निर्णय! नीरज चोप्राने JSW Sports शी तोडले संबंध
मागील काही महिन्यांतील दोन्ही देशांमधील वाढता राजकीय तणावाचा परिणाम आता क्रिकेटवर देखील दिसू लागला आहे. बांगलादेश महिला संघाचा भारत दौरा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला गेला आहे. तर ऑगस्टमध्ये प्रस्तावित असलेल्या भारतीय पुरुष संघाचा बांगलादेश दौरा देखील आता अडचणीत आला आहे.






