Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : ‘संघाची घोषणा ही स्पर्धेत सहभागी….’, पाकिस्तान टी-20 विश्वचषकात खेळण्याबाबत मोहसिन नक्वी यांचे विधान

टी-२० विश्वचषक २०२६ या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सहभागाबद्दल अजून देखील अनिश्चितता दिसून येत असून पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी एक विधान केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 26, 2026 | 04:49 PM
T20 World Cup 2026: 'The team announcement is for participation in the tournament...', Mohsin Naqvi's statement regarding Pakistan playing in the T20 World Cup.

T20 World Cup 2026: 'The team announcement is for participation in the tournament...', Mohsin Naqvi's statement regarding Pakistan playing in the T20 World Cup.

Follow Us
Close
Follow Us:

Mohsin Naqvi’s statement regarding the T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साथी सर्वच संघ चांगलेच तयारीला लागले आहेत. या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. काहीच दिवस शिल्लक असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी-२० विश्वचषक २०२६ साठी पाकिस्तानचा संघ जाहीर केला आहे. संघाची घोषणा केल्यामुळे  असे बोलले जात आहे की पाकिस्तान विश्वचषकात सहभागी होणार हे निश्चित मानले जात आहे. परंतु, प्रत्यक्ष चित्र काही वेगळे आहे. विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सहभागाबद्दल अजून देखील अनिश्चितता दिसून येत आहे. दरम्यान, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी एक विधान केले आहे. ते म्हणाले आहे की, संघाची घोषणा ही स्पर्धेत सहभागी होण्याची पुष्टी मानण्यात येऊ नये.

एका वृत्तानुसार, संघाची घोषणा केल्यानंतर, नक्वी यांनी विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंसोबत बंद दाराआड बैठक घेऊन खेळाडूंना पीसीबीच्या सध्याच्या भूमिकेबद्दल आणि सरकारच्या भूमिकेबद्दल माहिती दिली गेली. लाहोरमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान, नक्वी यांनी खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांना सांगितले की, “आम्ही सरकारच्या सल्ल्याची वाट पाहत असून  सरकार कोणताही निर्णय घेईल, आम्ही त्याचे पालन करणार, जर त्यांना आम्हाला विश्वचषकात सहभागी होऊ नये असे वाटत असेल तर,  तर आम्ही जाणार नाही.”

हेही वाचा : IND vs NZ T-20 Series : श्रेयस अय्यरला लागली लॉटरी! संघातील स्थान राहणार कायम; तिलक वर्मा T20I मालिकेबाहेर

एका वृत्तांनुसार, खेळाडूंकडून या मुद्द्यावर पीसीबी आणि सरकारला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. त्यांनी सांगितले की बोर्ड आणि सरकार जो काही निर्णय घेईल त्याचे ते समर्थन करणार आहेत. पाकिस्तान सोमवारी या प्रकरणावर आपला अंतिम निर्णय जाहीर करणार  अशी अपेक्षा आहे. रविवारी माध्यमांशी संवाद साधताना नक्वी म्हणाले की, “संघाने विश्वचषकात खेळावे की नाही याबद्दल बोर्ड अजून देखील  पाकिस्तान सरकारच्या अंतिम निर्णयाची वाट पाहत आहे. त्यांनी सांगितले की खेळाडूंनाही याबाबत  स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे.

टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानला भारत, नामिबिया, अमेरिका आणि नेदरलँड्ससह गट अ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.  पाकिस्तान क्रिकेट संघ त्यांचे सर्व विश्वचषक सामने भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखालील श्रीलंकेमध्ये खेळणार आहेत. जर पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला तर आयसीसी त्यांच्यावर कठोर निर्बंध लादण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : IND vs NZ 3rd T-20 Match : युवराज सिंगचा विक्रम मोडला जाईल? अभिषेक शर्माच्या उत्तराने चाहत्यांच्या मनात केले घर

टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ:

सलमान अली आघा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान (यष्टीरक्षक) आणि उस्मान तारिक.

Web Title: T20 world cup 2026 mohsin naqvis statement regarding pakistans participation in the t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • PAK vs IND
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशने आपल्या खेळाडूंसोबत केला विश्वासघात! नझमुल पुन्हा संघात पुनरागमन
1

T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशने आपल्या खेळाडूंसोबत केला विश्वासघात! नझमुल पुन्हा संघात पुनरागमन

IND vs NZ : तिलक वर्मा विश्वचषकासाठी तयार, यादिवशी करणार संघामध्ये पुनरागमन! कोणाचा होणार पत्ता कट?
2

IND vs NZ : तिलक वर्मा विश्वचषकासाठी तयार, यादिवशी करणार संघामध्ये पुनरागमन! कोणाचा होणार पत्ता कट?

आयसीसीने बांगलादेशवर भेदभावाचा आरोप…ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूच्या वक्तव्यावर शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा! आरोप प्रत्यारोपाचा ड्रामा
3

आयसीसीने बांगलादेशवर भेदभावाचा आरोप…ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूच्या वक्तव्यावर शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा! आरोप प्रत्यारोपाचा ड्रामा

पाकिस्तानच्या T20 World Cup 2026 च्या संघात कर्णधार बदलला! टीममध्ये केले 7 बदल; या खेळाडूंनी जिंकला जॅकपॉट
4

पाकिस्तानच्या T20 World Cup 2026 च्या संघात कर्णधार बदलला! टीममध्ये केले 7 बदल; या खेळाडूंनी जिंकला जॅकपॉट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.