श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मीडिया)
Shreyas Iyer will remain in the Indian team : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील ३ सामने खेळवून झाले आहेत. या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी तिलक वर्मा अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे आता श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात राहील. पहिल्या तीन सामन्यांसाठी तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला होता आणि आता तो मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात कायम राहणार आहे. हे दोन सामने विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम येथे खेळवण्यात येणार आहेत.
तिलक वर्मा याच्यावर अलीकडेच स्टेंटिक्युलर टॉर्शन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची जलदगतीने तंदुरुस्ती होत असल्याची बातमी मिळत आहे. विजय हजारे ट्रॉफी दरम्यान त्यांला वेदना जाणवू लागल्या होत्या. ज्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया आवश्यक होती. तो BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसन करत असून T20 विश्वचषकापूर्वी तो तंदुरुस्त होऊन संघात परतण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी तिलक वर्माला संघात स्थान दिलेले नाही.
एका वृत्तानुसार, तिलक वर्मा टी-२० विश्वचषक सराव सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यापूर्वी तो पुन्हा फिट होणार आहे. तिलक वर्मा वेगाने बरा होत. तथापि, सेंटर ऑफ एक्सलन्सला टी-२० विश्वचषकासाठी हिरवा कंदील मिळाल्यावर तो पूर्णपणे तयार असावा अशी शक्यता आहे.
भारतीय एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यरने अद्याप टी-२० मालिकेत एक देखील सामना खेळलेला नाही. तिलक वर्माच्या जागी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अय्यरला संघात स्थान देण्यात आले होते. अय्यरने डिसेंबर २०२३ मध्ये त्याचा शेवटचा टी-२० सामना खेळला असून तो तेव्हापासून त्याला टी-२० संघातून डच्चू देण्यात आले होता. अय्यरची टी-२० विश्वचषकासाठीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर तिलक वर्मा फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाला नाही तर अय्यरची लॉटरी लागू शकते.
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरबाबत देखील संघातील स्थान अनिश्चित आहे. दुखापतीमुळे त्याला टी-२० संघातून बाहेर ठेवण्यात आले होते आणि ११ जानेवारी रोजी बडोद्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापासून तो खेळू शकल नाही. सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना त्याला त्याच्या खालच्या बरगडीत वेदना झाल्या होत्या. त्यानंतर त्याचे स्कॅनिंग करण्यात आले. सुंदरच्या अनुपस्थितीत, बीसीसीआयने त्याच्या जागी रवी बिश्नोईची निवड केली आहे.






