Abhishek Sharma’s brilliant reply : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना काल, रविवारी गुवाहाटी येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ८ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेत ३-० असा विजय मिळवला. दरम्यान, भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने स्फोटक खेळी केली. त्याने १४ चेंडूत अर्धशतक ठोकले. तथापी, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर जमा आहे. त्याने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध फक्त १२ चेंडूत अर्धशतक ठोकून इतिहास रचला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अभिषेक शर्मा हा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला. तथापि, तो हा ऐतिहासिक पराक्रम साध्य करण्यात यशस्वी ठरला नाही. त्याने १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तरीही, त्याच्या खेळीने चाहत्यांची आणि क्रिकेट दिग्गजांना भरभरून आनंद दिल आणि मने जिंकली.
सामन्यानंतर, अभिषेक शर्माला युवराज सिंगचा विक्रम मोडण्यात अपयश आल्याबद्दल विचारणा करण्यात आली. प्रसारकांशी बोलताना अभिषेकने अगदी मोजकी उत्तर दिली. तो म्हणाला की युवराज सिंगचा विक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी अशक्यापेक्षा जास्त कठीण आहे. तसेच त्याने हे देखील मान्य केले की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून कोणताही फलंदाज ते करू शकतो.
अभिषेक शर्मा पुढे म्हणाले की या मालिकेत सर्व फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि येणारे सामने आणखी रोमांचक असणार. जेव्हा संघाचे वातावरण सकारात्मक असते तेव्हा वैयक्तिक विक्रम आपोआप बनत जातात.
धावांचा पाठलाग करण्यासाथी उतरलेल्या अभिषेक शर्माने या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून आपले खाते उघडले. त्याने अलीकडेच असे अनेक वेळा करून दकाहवले आहे. याबद्दल अभिषेकला विचारले असता, तो म्हणाला की तो जाणूनबुजून पहिल्या चेंडूवर हल्ला करण्याची योजना आखत नाही. हे सर्व एक प्रकारची प्रवृत्ती आहे जी खेळपट्टीवर पोहोचल्यानंतर आपोआप कार्य करत असते.
अभिषेकने स्पष्ट केले की तो गोलंदाजाबद्दल आणि पहिल्या चेंडूवर तो कोणत्या प्रकारची चेंडू टाकण्याची शक्यता आहे? याबद्दल विचार करतो आणि त्यानुसार प्रतिक्रिया देतो. अभिषेकचे लक्ष हे फक्त योग्य चेंडू योग्य पद्धतीने खेळण्यावर आहे.
हेही वाचा : शुभमन गिलला पुन्हा T20 संघात खेळण्याची संधी मिळेल का? बीसीसीआयच्या मान्यतेने, अशक्य गोष्ट होईल शक्य!
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंडने २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १५३ धावा केल्या होत्या. ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ४८ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाने केवळ १० षटकांतच लक्ष्य गाठत सामना जिंकला. अभिषेक शर्माने नाबाद ६८ धावांची तुफानी खेळी केली, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ५७ धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला.






