
रियान पराग खेळणार का याकडे लक्ष
राजस्थान आणि दिल्ली या दोन्ही संघांसाठी विजय अनिवार्य
अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर रंगणार सामना
Tata IPL 2026 DC Vs RR Live: थोड्याच वेळात दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना सुरू होणार आहे. आयपीएलचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र अजून क्वालिफाय करणारे संघ ठरले नाहीत. अद्याप लढाई सुरू आहे. थोड्याच वेळात हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांसाठी प्ले ऑफला जाण्यासाठी आजचा सामना जिंकणे महत्वाचे असणार आहे. अखेर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुखापतीमुळे मागील सामन्यात रियान पराग खेळू शकला नव्हता. त्याच्या ऐवजी यशस्वी जयस्वालने कर्णधार म्हणून राजस्थानचे नेतृत्व केले होते. मात्र राजस्थान रॉयल्सचा त्या सामन्यात पराभव झाला होता. सुरुवातीला फॉर्ममध्ये असणाऱ्या संघाची गाडी दुसऱ्या टप्प्यात घसरली आहे. प्ले ऑफमध्ये अन्यासाठी आजचा आणि पुढील सर्व सामने त्यांना जिंकणे आवश्यक आहे.
काय आहे आजचा पीच रीपोर्ट?
आजचा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. दिल्लीचे हे मैदान ऐतिहासिकदृष्ट्या फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. मात्र काही ओव्हर झाल्यावर स्पिनर्सला मदत मिळते. इतर मैदानांच्या तुलनेत मैदानचा आकार लहान असल्याने मोठा स्कोअर या ठिकाणी पाहायला मिळतो.
DC Vs RR Pitch Report: दिल्लीचा ‘स्वॅग’ की राजस्थानचा ‘थाट’? पहा आजचा पीच रिपोर्ट
सामन्याच्या मध्यंतरात खेळपट्टी स्लो होऊ शकते. त्यामुळे राजस्थान आणि दिल्लीच्या स्पिनर्सला मदत मिळू शकते. संध्याकाळी या ठिकाणी दव पडण्याचा अंदाज आहे. दव पडले तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण जाऊ शकते. या मैदानावर टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार घेऊ शकतो. धावांचा पाठलाग करणे येथे सोपे समजले जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.
दुसरीकडे दिल्लीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये 8 व्या स्थानावर आहे. मात्र अद्याप त्यांच्या प्ले ऑफच्या आशा जिवंत आहेत. त्यामुळे दिल्ली पुढील सर्व सामने जिंकल्यास ते देखील प्ले ऑफमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. रोमांचक सामना पाहायला मिऊ शकतो. या ठिकाणी मोठी धावसंख्या देखील पाहायला मिळू शकते.
RCB vs PBKS : ‘किंग’ Kohli चा नवा रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
दिल्ली कॅपिटल्सचा संघ: के.एल. राहुल (यष्टिरक्षक), पाथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, काइल जेमीसन / लुंगी एंगिडी, टी. नटराजन / मुकेश कुमार.
राजस्थान रॉयल्सचा संघ: यशस्वी जयस्वाल, रविंद्र जडेजा, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, वैभव सूर्यवंशी, शिमरन हेटमायर, डोनोवन फरेरा, शुभम दुबे, यश राज, ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा