राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना झाला, हा सामान सुपर ओव्हरमध्ये गेला आणि या सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने विजय मिळवून स्पर्धेचा पाचवा विजय नावावर केला आहे.
करुण दुर्दैवी ठरला आणि धावबाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. तर दुसरीकडे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याला चालू सामन्यांमध्ये दुखापत झाली त्यामुळे त्याला सामन्यातून रिटायर आऊट व्हावे लागले.
पहिल्या डावांमध्ये फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने 189 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही संघानी कशाप्रकारे कामगिरी केली यावर एकदा नजर टाका.
आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामने दोन्ही संघाना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरतील.