
142 रन्समध्ये आटोपला दिल्लीचा डाव
केकेआरचा दिल्ली कॅपिटल्सवर 8 विकेट्सने विजय
फीन एलनने केले शानदार अर्धशतकी खेळी
Tata IPL 2026 DC Vs KKR Live: आज दिल्लीच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सने (KKR Vs DC) पथूम निसांकाच्या अर्धशतकी खेळीवर 142 रन्सपर्यंत मजल मारली. अखेर या सामन्यात केकेआरचा विजय झाला आहे. केकेआरने दिल्लीवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.
केकेआरची फलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 143 रन्सचा पाठलाग करण्यासाठी केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन हे मैदानात उतरले. कर्णधार अजिंक्य रहाणे आज केवळ 13 रन्स करून आउट झाला. तर फीन एलनने अर्धशतकी खेळी केली. चांगल्या फॉर्ममध्ये असणारा अंगरीक्ष रघुवंशी केवळ 1 रन्स करून आउट झाला.
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सने चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला चांगली गोलंदाजी करत महत्वाच्या दोन विकेट्स पटकावल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेला मिशेल स्टार्कने रन आउट केले. तर अक्षर पटेलने अंगरीक्ष रघुवंशीला आउट केले.
DC Vs KKR Live: होम ग्राऊंडवर दिल्ली गडबडली; ‘कॅपिटल्स’ धारातीर्थी; केकेआरला ‘इतक्या’ रन्सची गरज
दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी
केकेआरने दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. दिल्लीकडून केएल राहूल आणि पथूम निसांका यांनी डावाची सुरुवात केली. मात्र केएल राहूल 14 बॉलमध्ये 23 रन्स करून आउट झाला. त्यानंतर चांगला फॉर्म असलेला नितीश राणा खेळण्यासाठी आला. तो 8 रन्स करून आउट झाला.
त्यानंतर पहिल्या काही सामन्यात अचूक आणि चांगली खेळी करणारा समीर रिझवी गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. तोसुद्धा फक्त 3 रन्स करून आउट झाला. दिल्लीच्या शेवटच्या क्षणी महत्वाची खेळी करून सामना जिंकून देणाऱ्या स्टब्सला साजेशी खेळी करता आली नाही. त्याने एकूण 2 रन्स केल्या. सलामीवीर पथूम निसांकाने मात्र दिल्लीचा डाव सवरण्याचा प्रयत्न केला. त्याने अर्धशतकी खेळी केली. तो 50 रन्स करून आउट झाला. कर्णधार अक्षर पटेल 11 रन्स करून आउट झाला. आशुतोष शर्माने महत्वाची 39 रन्सची खेळी केली. मिशेल स्टार्क रन आउट झाला.
Keen on 𝙁𝙞𝙣𝙣-ishing the chase early 🔥 Finn Allen brings up his first fifty of the season in just 3⃣2⃣ deliveries 💪 Updates ▶️ https://t.co/NaWLphmJKY#TATAIPL | #KhelBindaas | #DCvKKR pic.twitter.com/jSiDY56DOK — IndianPremierLeague (@IPL) May 8, 2026
केकेआरची गोलंदाजी
केकेआरच्या गोलंदाजांनी फलंदाजांना मुक्तपणे खेळूच दिले नाही. 100 रन्सच्या आतच दिल्लीने 5 महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. अनुकूल रॉयने पथूम निसंका आणि स्टब्सची विकेट घेतली. त्यानंतर कार्तिक त्यागीने केएल राहूलची विकेट घेतली. सुनील नरेनने समीर रिझवीची विकेट घेतली. कॅमरुन ग्रीनने नितीश राणाला आउट केले. कार्तिक त्यागीने दोन महत्वाच्या विकेट पटकावल्या.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन.
नेमकं काय घडतयं? भारतीय संघाला मिळणार ‘हा’ नवा कोच; गौतम गंभीर काय निर्णय घेणार?
कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि फिन्न ॲलन, अंगकृष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, भवअरोरा, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक आणि सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर).