DC Vs KKR Live Streaming (फोटो- ट्विटर)
अजिंक्य रहाणेचा गोलंदाजीचा निर्णय
पथूम निसांकाचे शानदार अर्धशतक
दिल्लीने 100 वर गमावल्या 5 विकेट्स
Tata IPL 2026 KKR Vs DC Live Updates: दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना सुरू आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना जिंकणे अनिवार्य असणार आहे. दरम्यान दिल्लीने प्रथम फलंदाजी (KKR Vs DC) केली. दिल्लीची फलंदाजी कोलमडली असल्याचे दिसून आले. अखेर दिल्ली कॅपिटल्सने केकेआरला 143 रन्सचे टार्गेट दिले आहे. दिल्लीच्या गोलंदाजांना सामना जिकण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी
केकेआरने दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. दिल्लीकडून केएल राहूल आणि पथूम निसांका यांनी डावाची सुरुवात केली. मात्र केएल राहूल 14 बॉलमध्ये 23 रन्स करून आउट झाला. त्यानंतर चांगला फॉर्म असलेला नितीश राणा खेळण्यासाठी आला. तो 8 रन्स करून आउट झाला.
From 74/1 to 89/5 😮 Led by their spinners, @KKRiders wreaking havoc on the #DC batting line-up 💜 Updates ▶️ https://t.co/NaWLphmJKY#TATAIPL | #KhelBindaas | #DCvKKR pic.twitter.com/MdRt8UJImv — IndianPremierLeague (@IPL) May 8, 2026
त्यानंतर पहिल्या काही सामन्यात अचूक आणि चांगली खेळी करणारा समीर रिझवी गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. तोसुद्धा फक्त 3 रन्स करून आउट झाला. दिल्लीच्या शेवटच्या क्षणी महत्वाची खेळी करून सामना जिंकून देणाऱ्या स्टब्सला साजेशी खेळी करता आली नाही. त्याने एकूण 2 रन्स केल्या. सलामीवीर पथूम निसांकाने मात्र दिल्लीचा डाव सवरण्याचा प्रयत्न केला. त्याने अर्धशतकी खेळी केली. तो 50 रन्स करून आउट झाला. कर्णधार अक्षर पटेल 11 रन्स करून आउट झाला. आशुतोष शर्माने महत्वाची 39 रन्सची खेळी केली. मिशेल स्टार्क रन आउट झाला.
केकेआरची फलंदाजी
केकेआरच्या गोलंदाजांनी फलंदाजांना मुक्तपणे खेळूच दिले नाही. 100 रन्सच्या आतच दिल्लीने 5 महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. अनुकूल रॉयने पथूम निसंका आणि स्टब्सची विकेट घेतली. त्यानंतर कार्तिक त्यागीने केएल राहूलची विकेट घेतली. सुनील नरेनने समीर रिझवीची विकेट घेतली. कॅमरुन ग्रीनने नितीश राणाला आउट केले. कार्तिक त्यागीने दोन महत्वाच्या विकेट पटकावल्या.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन.
मीच IPLचा बादशाह! Bhuvneshwar Kumar ने रचला ‘हा’ विक्रम; ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि फिन्न ॲलन, अंगकृष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, भवअरोरा, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक आणि सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर).






