
तिलक वर्माने 9 बॉलमध्ये मुंबईच्या बाजूने फिरवला सामना
चुरशीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय
पंजाबचा सलग 5 वा तर मुंबईचा लीगमधला 4 था विजय
MI Vs PBKS IPL 2026 Updates: काल हिमाचल प्रदेशच्या धरमशाळा क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. कालचा सामना अत्यंत रोमांचक अशा स्थितीत झाल्याचे दिसून आले. पंजाब किंग्जने आपला सलग 5 वा सामना हातातून गमावला आहे. तर या लीगमध्ये मुंबईने आपला चौथा विजय नोंदवला आहे. तिलक वर्मा या सामन्याचा प्रमुख खेळाडू ठरला आहे.
पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 200 रन्स केल्या होत्या. मुंबईने 201 रन्सचे हे टार्गेट शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. तीन ओव्हरमध्ये 50 रन्स हवे असताना विल जॅक आणि तिलक वर्माने जबरदस्त खेळी केली. मुंबईने 6 विकेट्सने पंजाबवर विजय मिळवला आहे. तिलक वर्माने 33 बॉलमध्ये 75 रन्सची खेळी केली.
58 व्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाबवर विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 200 धावांचे विशाल आव्हान उभे केले. मात्र, मुंबईने 1 बॉल राखून हे लक्ष्य गाठले आणि पंजाबचा पराभव केला आहे. 201 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मुंबईची सुरूवात वेगवान झाली. रायन रिकलटनने अवघ्या 23 बॉलमध्ये 48 रन्स केल्या. रोहित 25 रन्स करून आउट झाला. त्यानंतर मुंबईचे फलंदाज झटपट आउट झाले. खेळपट्टीवर धावा करणे कठीण होऊ लागले आणि सामना पंजाबच्या बाजूने झुकताना दिसत होता.सामना अशा वळणावर आला जिथे मुंबईला शेवटच्या ओव्हरमध्ये 50 रन्सची गरज होती.
तिलक वर्माचा तडाखा
शेवटच्या ओव्हरपर्यंत तिलक वर्माने झुंज दिली आणि ती यशस्वी ठरवली. शेवटच्या 18 बॉलमध्ये 50 रन्सचे अशक्य असणार आव्हान तिलक वर्मा आणि विल जॅक्स या जोडीने पूर्ण केले. मुंबईला एक अविश्वसनीय विजय मिळवून दिला. 17 ओव्हर झाल्या तेव्हा पंजाब जिंकेल असे वाटत होते. तिलक 24 बॉलमध्ये 45 रन्स करून खेळत होता. 18 व्या ओव्हरमध्ये दोघांनी तुफानी फटकेबाजी केली. 19 व्या ओव्हरमध्ये सामना बदलला. तिलकने 33 मध्ये 75 रन्सची नाबाद खेळी केली. महत्वाच्या 9 बॉलमध्ये तिलकने दूर चाललेला सामना मुंबईच्या दिशेने फिरवला.
IPL 2026 चा थरार! वर्माचा विजयी ‘तिलक’; पलटणकडून PBKS चा पंचनामा, किंग्जचे टेंशन वाढले
तिलकची विजयी खेळी
जेव्हा मधल्या षटकांमध्ये मुंबई इंडियन्सच्या एकापाठोपाठ एक विकेट पडल्या आणि पंजाबला पुनरागमन करण्याची संधी मिळाली, तेव्हा तिलकने केवळ एक संयमी खेळीच केली नाही, तर शेवटच्या षटकांमध्ये जलद धावा करून पंजाबला सामन्यातून वाचवले. तथापि, मार्को जॅनसेनकडूनही तिलकला जीवदान मिळाले. आपल्या सामना जिंकवून देणाऱ्या खेळीत, तिलकने मुंबईसाठी ६ षटकार आणि ६ चौकार मारले. विजयानंतर, तिलक वर्माने संघाचा वरिष्ठ खेळाडू रोहित शर्माला समर्पित एक विशेष जल्लोष केला.