Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs RR Live: आधी पावसाने झोडपलं, मग Vaibhav Suryvanshi ने धोपटलं! राजस्थानकडून आरसीबी ‘चितपट’

विराट कोहलीने चांगली सुरुवात केली होती. मात्र त्याला त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. विराट कोहली 32 रन्स करून आउट झाला. ऑलराउंडर कृनाल पंड्या केवळ 1 रन करून आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 11, 2026 | 12:08 AM
RCB Vs RR Live: आधी पावसाने झोडपलं, मग Vaibhav Suryvanshi ने धोपटलं! राजस्थानकडून आरसीबी ‘चितपट’
Follow Us
Follow Us:

रजत पाटीदारची 63 रन्सची तुफानी खेळी 
आरसीबीचे राजस्थानला 202 रन्सचे टार्गेट 
पाऊस झाल्यामुळे उशिरा सुरू झाला सामना

Tata IPL 2026 Live RR Vs RCB Live Updates: आज गुवाहाटीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये (RR vs RCB) सामना पार पडला. पाऊस झाल्यामुळे सामना अर्ध ते पाऊण तास उशिरा सुरू झाला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 201 रन्स केल्या. अडचणीत सापडलेल्या संघाला कर्णधार रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीने सावरले. अखेर या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सूर्यवंशी आणि जुरेलच्या खेळीवर आरसीबीचा 6 विकेट्सने पराभव केला आहे.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी

आरसीबीने दिलेल्या 202 रन्सचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले. यशस्वी जयस्वाल या सामन्यात साजेशी कामगिरी करू शकला नाही. यशवी जयस्वाल 13 रन्स करून आउट झाला. आरआरच्या वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेलने पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांची धुलाई केली. 6 ओव्हर्समध्ये राजस्थान रॉयल्सने 93 रन्स केल्या. वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद अर्धशतक केले. वैभव सूर्यवंशी 26 बॉल्समध्ये 78 रन्सची तुफानी खेळी केली. 78 रन्स करून तो आउट झाला. त्यानंतर हेटमायर देखील एकही रन करता आउट झाला. ध्रुव जुरेलने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. रवींद्र जाडेजा 24 रन्स करून नॉट आउट राहिला. तर ध्रुव जुरेल देखील 81 रन्सवर नॉट आउट राहिला.

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सकडून पहिली ओव्हर जोफ्रा आर्चरने टाकली. त्याने पहिल्याच बॉलवर फील सॉल्टला आउट केले. त्यानंतर जोफ्रा आर्चरने देवदत्त पाडीकलची विकेट घेतली. रवी बिश्नोईने विराट कोहलीची विकेट पटकावली. रवी बिश्नोईने कृणाल पंड्याला देखील आउट केले. तर जितेश शर्माची विकेट ब्रिजेश शर्माने घेतली. ब्रिजेश शर्माने टीम डेव्हिडला आउट केले. तर रवींद्र जाडेजाने शेफर्डला आउट केले. कर्णधार रियान पराग कर्णधारपदाला साजेशी खेळी करू शकला नाही.

There’s no stopping him 🤩 🎥 Glimpses of another powerful knock from Dhruv Jurel 💪 Updates ▶️ https://t.co/X76bJjmq1j#TATAIPL | #KhelBindaas | #RRvRCB | @rajasthanroyals pic.twitter.com/CnO6xh0LKC — IndianPremierLeague (@IPL) April 10, 2026

आरसीबीची गोलंदाजी

आरसीबीच्या गोलंदाजांनी राजस्थानची फॉर्ममध्ये असणारी जोडी पॉवर प्लेमध्ये फोडली. जोश हेझलवूडने यशस्वी जयस्वालला 13 रन्सवर आउट केले. कृणाल पंड्या तुफानी खेळी करत असलेल्या वैभव सूर्यवंशीला 78 रन्सवर आउट केले. तर हेटमायरला बाऊन्सर बॉलवर आउट केले.जोश हेझलवूडने कर्णधार रियान परागला आउट केले.

RR Vs RCB: रजत पाटीदार आरसीबीसाठी ठरला ‘संकटमोचक’; आरआरला हॅट्रिकसाठी 202 रन्सची गरज

आरसीबीची फलंदाजी

आरसीबीकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी विराट कोहली आणि फिलिप सॉल्ट मैदानात उतरले. दरम्यान फिलिप सॉल्ट पहिल्याच बॉलवर आउट झाला. त्यानंतर देवदत्त पाडीकल खेळण्यासाठी आला. पाडीकल 7 बॉलमध्ये 14 रन्स करून आउट झाला. विराट कोहलीने चांगली सुरुवात केली होती. मात्र त्याला त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. विराट कोहली 32 रन्स करून आउट झाला. ऑलराउंडर कृनाल पंड्या केवळ 1 रन करून आउट झाला. विकेट किपर जितेश शर्मा 5 रन्स करून आउट झाला. टीम डेव्हिड 13 रन्स करून आउट झाला. शेफर्डने 22 रन्स केल्या. कर्णधार रजत पाटीदारने 63 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली.

आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, अभिनंदन सिंग, जितेश शर्मा, शशांक सिंग.

RCB VS RR Live: पाऊस गेला अन टॉस झाला; होम ग्राऊंडवर रियान परागने घेतला ‘हा’ निर्णय

आरआरची संभाव्य टीम: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रविंद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर.

Web Title: Tata ipl 2026 vaibhav suryvanshi dhruv jurel rr beat rcb by 6 wickets guwahati live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:02 AM

Topics:  

  • IPL 2026
  • Rajat Patidar
  • RR vs RCB
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला
1

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.