
गुजरात टायटन्सचे एसआरएला दिलेले 169 रन्सचे टार्गेट
कगीसो रबाडाने उडवली एसआरएचची दाणादाण
गुजरात टायटन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर
Tata IPL 2026 GT Vs SRH Live Updates: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना झाला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना एसआरएचला 169 रन्सचे टार्गेट दिले होते. साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीवर गुजरातने 168 पर्यंत मजल मारली. अखेर (IPL 2026) या सामन्यात भेदक गोलंदाजीच्या मदतीने गुजरातने एसआरएचचा 86 रन्सने पराभव केला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स 16 पॉईंट्ससह पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे.
एसआरएचची फलंदाजी
गुजरात टायटन्सने दिलेल्या 169 रन्सचा पाठलाग करण्यासाठी एसआरएचकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा मैदानात उतरले. मात्र यावेळेस हे दोन्ही खेळाडू एसआरएचला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत. ट्रेविस हेड शून्यावर आउट झाला. तर अभिषेक शर्मा 6 रन्स करून आउट झाला. त्यामुळे एसआरएचचा संघ अडचणीत सापडला.
GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट
त्यानंतर माजी कर्णधार इशान किशन 11 रन्स करून आउट झाला. तर हेनरी क्लासेन सुद्धा केवळ 14 रन्स करून आउट झाला. स्मरण रविचंद्रनने 9 रन्स केल्या. पाठोपाठ संहिल अरोरा 6 रन्स करून आउट झाला. तर आजच्या सामन्यात एसआरएचचे सर्व फलंदाज ढेपाळले असल्याचे पाहायला मिळाले. नितीश कुमार रेड्डीने केवळ 2 रन्स केल्या. कर्णधार पॅट कमिन्स 19 रन्स करून आउट झाला.
गुजरात टायटन्सची गोलंदाजी
169 रन्सचा बचाव करण्यासाठी गुजरातचे गोलंदाज मैदानात उतरले. सुरुवातीपासून पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांनी एसआरएचच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. कगीसो रबाडाने तर एसआरएचची दाणादाण उडवली. मोहम्मद सिराजने ट्रेविस हेडला शून्यावर आउट केले. त्यानंतर कागिसो रबाडाने अभिषेक शर्मा, इशान किशन आणि रविचंद्रनच्या अशा तीन महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. तर जेसन होल्डरने हेनरी क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डीची विकेट घेतली. प्रसिद्ध कृष्णाने साहिल अरोराला आउट केले.
गुजरात टायटन्सची फलंदाजी
गुजरात टायटन्सकडून सलामीला खेळण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात आले. सध्या शुभमन आणि साई सुदर्शन हे आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहेत. मात्र गेल्या सामन्याप्रमाणे या दोघांना चांगली सुरुवात करून देता आली नाही. कानरधार शुभमन गिल केवळ 5 रन्स करून आउट झाला. त्यानंतर खेळण्यासाठी जोस बटलर आला. मात्र तो देखील सजहसी खेळी करू शकला नाही. तो 7 रन्स करून आउट झाला. गुजरातच्या फलांदाजांना आपल्या होम ग्राऊंडचा फारसा फायदा उठवता आला नाही. निशांत सिंधू केवळ 22 रन्स करून आउट झाला. साई सुदर्शनने शानदार अर्धशतकी खेळी केली. 61 रन्स करून तो आउट झाला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे गुजरातने एक सन्मानजनक स्कोअर उभा केला आहे.
Brilliant powerplay for #GT 👌 Kagiso Rabada 🤝 Mohd. Siraj made the ball talk 🫡#SRH 34/4 after 6 overs Updates ▶️ https://t.co/o2tKKCeEaH#TATAIPL | #KhelBindaas | #GTvSRH | @gujarat_titans pic.twitter.com/nlgionSxru — IndianPremierLeague (@IPL) May 12, 2026
एसआरएचची गोलंदाजी
एसआरएचने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा तो निर्णय सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये योग्य ठरला आहे. प्रफुल हिंगेने जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार शुभमन गिलची विकेट पटकावली. प्रफुल हिंगेने जोस बटलरला देखील आउट केले. कर्णधार पॅट कमिन्सने निशांत सिंधुची विकेट पटकावली. सकीब हुसेनने सुदर्शनला आउट केले.
गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग 11: साई सुदर्शन, शुभमन गिल, जोस बटलर, वाशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, निशांत सिंधू , राहुल तेवातिया, राशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुतार.
GT Vs SRH Live: अहमदाबादच्या स्टेडियमवर वादळ येणार; पॅट कमिन्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग 11: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स, शिवांग कुमार, ईशान मलिंगा, साकिब हुसेन, हर्ष दुबे.