फोटो सौजन्य : X
भारतीय महिला संघाने नुकताच श्रीलंका दौरा केला. यामध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने ट्राय सिरीज जिंकली आणि जेतेपद नावावर केले. पुढच्या महिन्यात भारतीय महिला संघ त्याचबरोबर पुरुष संघ आणि अंडर नाईन्टीन युवा खेळाडूंचा संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे त्याआधी आता भारतीय संघाचे अष्टपैलू दीप्ती शर्मा संदर्भात मोठे अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने तिच्याच सहकारी खेळाडूविरुद्ध २५ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सकडून खेळणाऱ्या आरुषी गोयलवर दीप्तीने फसवणूक तसेच चोरीचा आरोप केला आहे. दीप्ती म्हणते की आरुषीने तिच्या घरातून २ लाख रुपयांचे पैसे, दागिने आणि परकीय चलन चोरले. आरुषी आग्रा येथे भारतीय रेल्वेमध्ये कनिष्ठ क्लार्क म्हणून तैनात आहे. क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त, दीप्ती आणि आरुषी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही एकमेकांना चांगले ओळखतात. यूपी वॉरियर्सकडून खेळण्याव्यतिरिक्त, हे दोन्ही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्येही एकत्र खेळले आहेत.
दीप्ती शर्माच्या वतीने आरुषीविरुद्ध तिचा भाऊ सुमित शर्माने आग्राच्या सदर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये, आरुषीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये चोरी, विश्वासघात आणि स्वाभिमान दुखावणे यांचा समावेश आहे. एफआयच्या मते, “क्रिकेटर्स असोसिएशनकडून खेळताना गेल्या काही वर्षांत दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. यानंतर, आरुषी आणि दीप्तीच्या पालकांनी आपत्कालीन परिस्थिती आणि कुटुंबातील आर्थिक संकटाचे कारण देत दीप्तीकडून पैसे वसूल करण्यास सुरुवात केली.”
Agra, Uttar Pradesh: Deepti Sharma, UP DSP and Indian women’s cricketer, along with junior player Arushi Goyal and her family, face a ₹25 lakh fraud case. Deepti’s brother filed an FIR after valuables went missing from her flat. Investigation is ongoing, says DCP Sonam Kumar pic.twitter.com/adGEH9JlSm
— IANS (@ians_india) May 22, 2025
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना, आग्रा सदरचे एसीपी सुकन्या शर्मा म्हणाले, “दीप्तीचा भाऊ सुमित शर्मा यांनी सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. प्रथमदर्शनी आम्हाला त्यात बरेच तथ्य आढळले आहे, म्हणून आम्ही आयपीसीच्या कलम ३०५ (अ) (चोरी), ३३१ (३), ३१६ (२) आणि ३५२ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.” तथापि, आरुषी गोयल यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. आरुषी म्हणाली की ती या प्रकरणाबाबत थेट दीप्तीशी बोलेल आणि गोष्टी स्पष्ट करेल.