फोटो सौजन्य : IndianPremierLeague
लखनऊच्या एकाना स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजस बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार जितेश शर्मा याने पहिले नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पहिले फलंदाजी करत बंगळुरूच्या संघासमोर 232 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यामध्ये हैदराबादच्या सर्व खेळाडूंनी बंगळुरूच्या सर्व गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली आहे. या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर संघात सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा यांने येतात धुव्वादार फलंदाजी करायला सुरुवात केली. अभिषेक शर्माने आजच्या सामन्यात 17 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या. यामध्ये त्याने तीन षटकार आणि तीन चौकार मारले त्याचबरोबर त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. ट्रॅव्हिस हेडचे आज संघामध्ये पुनरागमन झाले यामध्ये त्याने 10 मध्ये फक्त 17 धावा केल्या. हेनरिक क्लासेन याने आजच्या सामन्यात 13 चेंडूमध्ये 24 धावा केल्या यामध्ये दोन चौकार दोन षटकारांचा समावेश होता.
आजच्या सामन्यात इशान किशऩ याने संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे. त्याने आजच्या सामन्यात अर्धशतकीय खेळी खेळली. इशानचे आजच्या सामन्यात त्याचे 6 धावांनी शतक हुकले आहे. त्याने आजच्या सामन्यात संघासाठी 48 चेंडुमध्ये 94 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 षटकार आणि 7 चौकार मारले. ही त्याची या सिझनमध्ये दुसरी सर्वात मोठी खेळी आहे. अनिकेत वर्मा याने आजच्या सामन्यात त्याने नऊ चेंडूंमध्ये 26 धावा केले यामध्ये तीन षटकांचा समावेश आहे. नितीश कुमार रेड्डी आज विशेष कामगिरी करू शकला नाही.
Innings break!
Ishan Kishan’s magnificent leading act of 9⃣4⃣* to go along with useful cameos power #SRH to 231/6 🔥
Will #RCB chase down the BIG 🎯 ?
Updates ▶ https://t.co/sJ6dOP9ung#TATAIPL | #RCBvSRH | @SunRisers pic.twitter.com/F5obBrbQRA
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या गोलंदाजी बद्दल सांगायचं झालं तर रोमरीओ शेफर्ड याने संघासाठी दोन विकेट्स घेतले. भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, कृणाल पांड्या आणि लुंगी निगडी यांनी संघासाठी प्रत्येकी एक विकेट घेतला. दुसरा डावांमध्ये बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली वर आज चाहत्यांची नजर असणार आहे. विराट कोहली सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे त्यांनी आत्तापर्यंत या सिझनमध्ये सात अर्धशतक ठोकले आहेत. फिल सॉल्ट आणि विराट कोहली हे दोघे संघाला कशी सुरुवात करून देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल