
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India U19 VS South africa U19: भारतीय अंडर-19 क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना ४ जानेवारी रोजी खेळला गेला. भारताने DLS पद्धतीने हा सामना जिंकला. पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विश्वचषकाआधी भारतीय युवा संघाची ही महत्वाची मालिका आहे.
या मालिकेमध्ये भारतीय संघाचा मुख्य कर्णधार आयुष म्हात्रे हा भारतीय संघाचा विश्वचषकाचा भाग आहे पण तो या मालिकेमध्ये खेळणार नाही. त्याला दुखापत असल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे संघ मालिका जिंकण्यापासून फक्त 1 विजय दुर आहे. आता, भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. तर, तुम्ही दुसरा सामना कधी आणि कुठे पाहू शकता ते जाणून घेऊया.
भारत अंडर-१९ आणि दक्षिण आफ्रिका अंडर-१९ यांच्यातील दुसरा सामना ५ जानेवारी रोजी बिनोनी येथील विल्मोर पार्क येथे खेळला जाईल. चाहते या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना क्रिकेट साउथ आफ्रिकेच्या यूट्यूब चॅनेलवर थेट पाहू शकतात. पहिला सामना देखील त्याच चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आला. जरी ही मालिका हॉटस्टार अॅपवर प्रसारित होणार होती, परंतु तांत्रिक अडचणींमुळे ती प्रसारित झाली नाही.
पहिल्या सामन्यात भारताने फलंदाजी करताना ३०१ धावा केल्या. या सामन्यात संघाचा कर्णधार वैभव सूर्यवंशी अपयशी ठरला, त्याने १२ चेंडूत ११ धावा केल्या. हरवंश पंगालियानेही ९५ चेंडूत ९३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने २७.४ षटकांत ४ बाद १४८ धावा केल्या. तथापि, खराब हवामान आणि पावसामुळे पंचांनी भारताला २५ धावांनी विजयी घोषित केले.
वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन ए पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार, मोहम्मद कुमार, राहुल कुमार, युवराज सिंह, युवराज सिंह.