
Tennis Tournament : करण सिंहची चमकदार कामगिरी, आयटीएफ एम-25 जिंकत पटकावले वर्षातील चौथे जेतेपद
तिसरे मानांकन प्राप्त करणने फायनलमध्ये आपल्या अकादमीतील सहकारी खेळाडू दिग्विजय प्रताप सिंहचा पराभव केला. दुसऱ्या सेटमध्ये जेव्हा करण 7-5, 3-1 असा आघाडीवर होता, तेव्हा दिग्विजय दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर झाला.
हा 2026 हंगामातील करणचे चौथे जेतेपद ठरले. हा 23 वर्षीय खेळाडू मागील काही महिन्यांपासून चांगल्या फॉर्मात आहे. मुंबईत मिळालेला विजय हा त्याचा मागील दोन महिन्यातील दुसरा विजय ठरला. तो या काळात चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचला.
आउटडोर हार्ड कोर्टवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंधील पहिला सेट खूपच अटीतटीचा राहिला. एक तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या सेटमध्ये अखेरीस करणने बाी मारत तो 7-5 अशा आपल्या नावे केला.
Jeremy Lalrinnunga : अशी नशिबानं थट्टा मांडली; दुखापतीने रोखली भारताच्या गोल्डन बॉयची भरारी!
तिच लय कायम राखताना करणने दुसऱ्या सेटमध्ये 3-1 अशी आघाडी मिळवली. तेव्हा दुर्दैवाने 1 तास 32 मिनिटांच्या खेळानंतर दिग्विजय दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला, ज्यामुळे करणला अधिकृतरित्या चॅम्पियनशीप ट्रॉफी मिळाली.
मुंबईत खेळवण्यात आलेल्या संपूर्ण स्पर्धेदरम्यान करणने एकही सेट गमावला नाही. त्याने ‘राउंड ऑफ 32’ मध्ये नितीन कुमार सिन्हाला 6-4, 6-4 असे पराभूत करत मोहिमेची सुरुवात केली. ‘राउंड ऑफ 16’ मध्ये त्याने शानदार सर्व्हिसची कामगिरी दाखवली आणि आदिल कल्याणपुरचा 1 तास 38 मिनिटांमध्ये 7-5, 6-3 असा पराभव केला.
FIFA U-15 World Cup : भारताचा डबल धमाका! कॅमेरूनला 2-1 ने हरवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद
क्वार्टर फायनलमध्ये सातवे मानांकन प्राप्त सिद्धार्थ रावतच्या दुखापतीमुळे माघारीनंतर पुढील सेमिफायनलच्या सामन्यात करणने चिराग दुहनविरुद्ध दमदार कामगिरी केली. त्याने आपल्या सर्व्हिसवर 100 टक्के होल्ड रेट ठेवला होता. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने दुहानचा 6-3, 6-2 असा पराभव केला आणि फक्त 1 तास 19 मिनिटांत फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली.
ड्रॉच्या दुसरीकडे, दिग्विजयचा मुंबईतील हा आठवडा चांगला राहिला. त्याने या महिन्याच्या सुरुवातीला बाकूमध्ये आयटीएफ एम-15 चे जेतेपद जिंकले. दिग्विजयने सेमिफायनलमध्ये दुसरे मानांकन प्राप्त गॅरेट जॉन्सचा 6-4, 6-2 असा पराभव केला आणि राउंडग्लास टेनिस अकादमीसाठी पोडियमवरील 1-2 अशी स्थिती सुनिश्चित केली.
Ans: भारताच्या करण सिंहने मुंबईत झालेल्या आयटीएफ एम-25 टेनिस स्पर्धेचे एकेरीचे जेतेपद जिंकले.
Ans: मुंबईतील आयटीएफ एम-25 स्पर्धेतील विजय हे करण सिंहचे 2026 मधील चौथे जेतेपद ठरले.
Ans: महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम 30 हजार अमेरिकी डॉलर होती.